शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

दहावीच्या परीक्षेत विविध शाळांचे सुयश

By admin | Updated: June 19, 2014 23:56 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर आहे. यात जिल्ह्यातील शहरीच नाही तर ग्रामीण भागातील विविध शाळांनी चांगला निकाल देवून सुयश

गोंदिया : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर आहे. यात जिल्ह्यातील शहरीच नाही तर ग्रामीण भागातील विविध शाळांनी चांगला निकाल देवून सुयश प्राप्त केले आहे. अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा तसेच प्रावीण श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेने नाव उंचावले आहे.चौरागडे हायस्कूल गोंदियादहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात जानकीदेवी चौरागडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यात जानकीदेवी चौरागडे हायस्कूलच्या विद्यार्थी गौरव ठाकरे याने ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम, वैभव पारधीकर याने ९४ टक्के गुण घेवून द्वितीय तर प्रतिक पवार याने ९३ टक्के गुण घेवून विद्यालयातून तृतीत क्रमांक पटकाविला. याशिवाय लिलाधर केवट याने ९२.२० टक्के, सौरध केवट याने ९१.४० टक्के व सागर चन्ने याने ९०.४० टक्के गुण घेवून प्राविण्य श्रेणी मिळविली. परीक्षेला विद्यालयातील एकूण ४९ विद्यार्थी बसले होते. यापैकी सहा विद्यार्थी ९० टक्केच्या वर व इतर सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे व सर्व शिक्षकांना दिले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थापक सुरेश चौराडे यांनी त्यांचे कौतुक केले. मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरीदेवरीच्या मनोहरभाई पटेल हायस्कूलने दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची आपली परंपरा यावर्षीसुद्धा कायम ठेवली. शाळेचा निकाल ९२.४० टक्के लागला. या विद्यालयातून २६५ विद्यार्थ्यांपैकी २४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिल्पा आनंद राऊत या विद्यार्थिनीने ५०० पैकी ४७१ गुण प्राप्त केले. तिच्या निकालाची टक्केवारी ९४.२० असून तिने देवरी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थापक वासुदेव गजभिये, सचिव रामकुमार गजभिये, मुख्याध्यापक के.सी. शहारे, उपमुख्याध्यापक के.बी. गोंडाणे, पर्यवेक्षक एस.टी. हलमारे व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.के.डी. भास्कर विद्यालय डांगुरलीगोंदिया ग्रामीण भागातील डांगुरली येथील स्व. के.डी. भास्कर हायस्कूल, आर्ट, कॉमर्स व सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहाव्या वर्गाचा निकाल घोषित झाला. विद्यालयाचा निकाल ९०.५४ टक्के लागला. सरोज जितेंद्र शेंडे या विद्यार्थिनीने ८७.६० टक्के गुण घेवून प्रथम, माधुरी सुंदरलाल मेश्रामने ८४.६० टक्के गुण घेवून द्वितीय, पायल प्रमेश महंत या विद्यार्थिनीने ८१.८० टक्के गुण घेवून विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळा संचालक, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले. पशिने कन्या हायस्कूल दासगावमाध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या मार्च २०१४ च्या दहाव्या वर्गाचा निकाल नुकतचा घोषित झाला. यात अर्चना पशिने कन्या विद्यालय दासगाचा निकाल ९४.०६ टक्के लागला. केंद्रातून प्रथम येण्याची परंपरा सदर विद्यालयाने यावर्षीसुद्धा कायम ठेवली. गुलफशा जमील कुरेशी या विद्यार्थिनीने ८९.४० टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम, स्वाती अंगत कोल्हे हिने ८५.२० टक्के गुण घेवून द्वितीय तर काजल संजयगीर गीरी हिने ८३.६० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थासचिव एस.पी. पशिने, मुख्याध्यापिका व्ही.पी. बिसेन, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले. सरस्वती महिला विद्या. गोंदियास्थानिक सरस्वतीबाई महिला विद्यालयाचा दहाव्या वर्गाचा निकाल ९२.४४ टक्के लागला. एकूण ११९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पूजा लोकचंद चौधरी या विद्यार्थिनीने ९१.४० टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच सोनाली एकनाथ बोपचे (८९ टक्के), प्रतीक्षा योगीराज बैस (८७.८० टक्के), हर्षा मधुसूदन नागपुरे (८६.६० टक्के), दिशा प्रल्हाद अनकर (८५.६० टक्के), तृप्ती मानिक ठाकरे (८५.८० टक्के) गुण मिळविले. २० विद्यार्थी ‘अ’ प्राविण्य सूचित उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष दीपम पटेल, मुख्याध्यापिका धोमने, पर्यवेक्षक दीक्षित व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले. विक्रमबाबा विद्यालय डोंगरगावसडक/अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव/ख. येथील विक्रमबाबा विद्यालयाच्या वर्ग दहावीचा निकाल ९६ टक्के लागला. अतुल प्रेमलाल कठाणे या विद्यार्थ्याने ८४ टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम, भारती कृष्णा लांजेवार हिने ८३.८० गुण मिळवून द्वितीय तर हर्षल तुकाराम खोटेले याने ७६.४० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला. परीक्षेत बसलेल्या एकूण ५० विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय सर्व शिक्षक, शिक्षकेतर व आपल्या आई-वडिलांना दिले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थासचिव प्रा. शा.म. ठवरे, प्राचार्य एस.एस. ठवरे, शिक्षक टी.एस. जांभूळकर व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले. गणेशन कॉन्व्हेंट हाय. गोंदियामहाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत श्री गणेशन कॉन्व्हेंट हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. यात ऋतुजा घरोडेने ९३.४० टक्के, राम लालवानीने ९२.४० टक्के, हर्षिता कांबळेने ९० टक्के, बरखा आहुजाने ८० टक्के, कल्याणी मारवाडेने ८८.६० टक्के गुण मिळविले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय ए.एन. स्वामी, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले. स्वामी टेऊराम इं.शाळा गोंदियास्थानिक स्वामी टेऊराम आदर्श इंग्रजी हायस्कूलच्या वर्ग दहावीचा निकाल १०० टक्के लागला. एकूण १९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी चार विद्यार्थी ९० टक्केपेक्षा अधिक, आठ विद्यार्थी ७५ टक्केपेक्षा अधिक, दोन विद्यार्थी प्रथम श्रेणीत, चार विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व एक विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. यात भावेश घनश्याम पारधी याने ९३.८ टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम, सोमन समीर मट्टानी हिने ९२.८ टक्के गुण घेवून द्वितीय, आशिष मुकेश पंजवानी याने ९०.६० टक्के गुण घेवून तृतीय व मनिषा राजेश श्रोते हिने ९० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य प्रकाश ढोकले, किशोर गंगवानी, सर्व सभासद व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.चंचलबेन पटेल शाळा गोंदियास्थानिक चंचलबेन मनिभाई पटेल इंग्रजी माध्यम शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. दीपक नागपुरे या विद्यार्थ्याने ८९ टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम, रोहीत पंधरे याने ८६ टक्के गुण मिळवून द्वितीय तसेच अंकिता घोडसे व दीप्ती सिंग या दोघांनी ८६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संचालक जी.एन. फुंडे, मुख्याध्यापक एन.एन. फुंडे व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले. गुरूनानक हिंदी विद्या. गोंदियास्थानिक गुरूनानक हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या वर्ग दहावीचा निकाल ९४.५९ टक्के लागला. ओम अमरसिंग यादव या विद्यार्थ्याने ८१ टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच जुही रमेश टेंभरे हिने ७८.२० टक्के गुण मिळवून द्वितीय व अमन नरेश उजवणे याने ७६.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. भावेशचा सत्कार राज्यातील खटीक समाजातून इंग्रजी माध्यमाच्या दहाव्या वर्गातून स्थानिक माताटोली येथील रहिवासी विद्यार्थी भावेश घनश्याम पारधी याने ९३.८० टक्के असे सर्वाधिक गुण मिळविले. शिवाय गणित विषयात १०० टक्के गुण मिळविले. त्याबद्दल खटीक समाजातर्फे भावेशचा सत्कार करण्यात आला. भावेशने खटीक समाजाच्या विद्यार्थ्यांमधून सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल रामटेकचे खा. कृपाल तुमने, कमल कटारे, सतीश पारधी, रमन लारोकर, कुंडलीक पारधी, सुनील लारोकर, मनोहर पारधी, संतोष पारधी, संजय तुमाने, राधे पारधी, अजय तुमाने, गणेश पारवे, प्रवीण माकोडे, नंदा पारवे, दिशा माकोडे आदी समाजबांधवांनी त्याचे कौतुक केले. भावेशने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य ढोकले, शिक्षिका प्रथ्यानी, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले. संकल्प निकेतन विद्या.काटीकाटी येथील सुकन्या संकल्प निकेतन विद्यालयाचा दहावीचा निकाल ८८ टक्के लागला. परीक्षेला एकूण १३९ विद्यार्थी बसले होते. यापैकी १६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. वर्षा नरेंद्र चौरे या विद्यार्थिनीने ८६.२० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. इंग्रजीत अंजनी दिलीप चौडे या विद्यार्थिनीने ८५.८० टक्के गुण घेवून द्वितीत व युवरत्न सुखदेव देशकर याने ८४.२० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संचालक जी.एन. फुंडे, मुख्याध्यापक डी.एस. बहेकार व सर्व शिक्षक तसेच सर्व शिक्षकेतरांनी त्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)