शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवकाचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:39 IST

अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोरंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेवक आर.एम.रामटेके याच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रवींद्र ठाकरे निलंबनाची कारवाई केली आहे.

ठळक मुद्देसीईओंचे आदेश : कर्मचाºयांमध्ये एकच खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोरंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेवक आर.एम.रामटेके याच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रवींद्र ठाकरे निलंबनाची कारवाई केली आहे.आरोग्य सेवक आर.एम.रामटेके याच्या विरोधात विविध तक्रारी होत्या. त्यात पूर्र्व परवानगी न घेता कामावर गैरहजर राहणे, उद्धट बोलणे, गृहभेट न करणे, मुख्यालयी वास्तव्यास न राहणे, वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाची अवहेलना करण्याचा आरोप होता.मुकाअ ठाकरे यांनी या प्रकाराची गांभिर्याने दखल घेत महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील तरतुदीनुसार वर्तणूक नियमांचे भंग केल्याने रामटेकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळामध्ये त्याचे मुख्यालय तालुका आरोग्य अधिकारी तिरोडा येथे निश्चित करण्यात आले आहे.दरम्यान सदर कर्मचाºयाचे निलंबनाचे आदेश कार्यालयात पोहचताच कर्मचाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.पंधरा दिवसात सात कर्मचारी निलंबितजि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी ठाकरे यांनी जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, ग्रामपंचायत कार्यालयांना आकस्मिक भेटी देणे सुरू केले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी गोठगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता दोन कर्मचारी गैरहजर होते, याप्रकरणी त्यांना निलंबित केले. त्यानंतर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन शिक्षक आणि एका ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आता कोरंभीटोला येथील आरोग्य सेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कर्मचाºयांमध्ये चांगलीच दहशत असून गावकºयांकडून या कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.