शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

पोलीस कोठडीत आरोपीचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:28 IST

गोंदिया : चोरीच्या प्रकरणात आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपीचा ...

गोंदिया : चोरीच्या प्रकरणात आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २२) सकाळी ५.१५ वाजता उघडकीस आली. यामुळे आमगाव शहरात चांगलेच वातावरण तापले होते. राजकुमार अभयकुमार धोती (वय ३०, रा. कुंभारटोली) असे मृताचे नाव आहे.

आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोन वेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करण्यात आली आहे. या चोरीचा छडा लावताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुंभारटोली येथील राजकुमार अभयकुमार धोती (वय ३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) यांना संशयावरून अटक केली, तर एक विधिसंघर्षित बालक असल्याने त्याला अटक करण्यात आली नाही. या प्रकरणात तिघांकडून एलसीडी व इतर साहित्य स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले. पथकाने या तिघांना शुक्रवारी (दि.२१) रात्री १ वाजतादरम्यान आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, कोठडीत असताना राजकुमार धोती याचा शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद आमगाव पोलिसांनी घेऊन हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे दिले आहे. राजकुमार धोतीच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करताना आमगावचे न्यायाधीश, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. त्यांच्यासमोर कॅमेरा सुरू ठेवून तपासणी करण्यात आली.

-------------------------

मृताच्या शरीरावर अनेक जखमा

मृत राजकुमार धोती याच्या शरीरावर विविध प्रकारच्या जखमा होत्या. पोलीस ठाण्यातून मृतदेह उचलून उत्तरीय तपासणीसाठी आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेला असता तेथे त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा व व्रण असल्यामुळे मारहाणीमुळे त्याचा मृत्यू तर झाला नाही ना, अशी शंका येते. मारहाण केल्यामुळेच माझ्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताची बहीण हिने पोलीस ठाण्यात केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

-------------------------------

पोलीस निरीक्षकासह चौघेजण निलंबित (बॉक्स)

राजकुमार धोती याच्या मृत्यू प्रकरणात आमगाव पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना कारणीभूत ठरवून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आमगावचे ठाणेदार सुभाष चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, ठाणेदारांचा वाहनचालक पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे (ब.क्र.१०१४) व पोलीस शिपाई अरुण उईके (ब. क्र. १८७७) यांचा समावेश आहे. या चौघांना पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. आमगाव पोलिसांनी पोलिसांची प्रतिमा मलीन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य केले. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २५ व महाराष्ट्र पोलीस शिक्षा व अपील अधिनियम १९५६ मधील नियम ३ च्या पोटनियम (१-अ) (एक) (ब) अन्वये पोलीस अधीक्षकांनी त्या चौघांना निलंबित केले आहे.