शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडर चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST

तिरोडा : येथील गॅस वितरकाच्या खैरबोडी येथील गुदामातून भरलेले ३३ व रिकामे ९७ सिलिंडर अज्ञात चोरट्यांनी १५ मे रोजी ...

तिरोडा : येथील गॅस वितरकाच्या खैरबोडी येथील गुदामातून भरलेले ३३ व रिकामे ९७ सिलिंडर अज्ञात चोरट्यांनी १५ मे रोजी रात्री लंपास केले होते. या घटनेची नोंद तिरोडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी शोधचक्र फिरवून चोरी प्रकरणातील एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून १२ सिलिंडर हस्तगत करण्यात आले आहेत, तर उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. शुभम उर्फ गोली रतिराम आंबेडारे (२३, रा. पागा मोहल्ला, तिरोडा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

येथील सांकेशा गॅस वितरकाचे खैरबोडी येथे गुदाम आहे. १५ मे रोजी रात्री गोदामात ठेवलेले ३३ भरलेले व ९७ रिकामे असे एकूण १३० घरगुती वापराचे गॅस सिलिंडर चोरी झाल्याची तक्रार तिरोडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण दोन लाख १७ हजार ४७४ रूपये किंमतीचा माल चोरीस गेला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तिरोडा पोलिसांनी तपास करून संशयित शुभम आंबेडारे याला ताब्यात घेतले. त्याची कसून विचारपूस केली असता गुदामातून सिलिंडर चोरी केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, त्याच्याकडून १२ सिलिंडरही हस्तगत करण्यात आले. या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा समावेश असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून समोर आली आहे. त्यामुळे पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहे.