केशोरी : ग्रामपंचायतीनेच स्मशानभूमिसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर शेतकरी अतिक्रमण करुन पिक घेत आहेत. या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या तरी ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चेनत दहीकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष योगेश नाकाडे यांनी केला. स्मशानभूमिवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.शासनाने स्मशानभूमीसाठी जागा निर्माण करणे किंवा राखून ठेवणे यासारखे निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित गावच्या ग्रामपंचायत प्रशासनाकडे दिले आहेत. त्यानुसार केशोरी ग्रामपंचायतीने स्मशानभूमिसाठी जागा मुखरर करुन राखीव ठेवली आहे. त्याचा उपयोग स्मशानभूमिसाठी होत आहे. या स्मशानभूमी लगत असलेल्या शेतकऱ्यांनी स्मशानभूमिच्या जागेवर अतिक्रमण करुन धान पिक घेणे सुरु केले आहे. यासंबंधी काही नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे सूचना केली आहे. ग्रामपंचायतीने आपण स्मशानभूमिसाठी राखून ठेवलेली जागा मोजून खरोखरच शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. स्मशानभूमिवरील जागेवर अतिक्रमण आढळून आल्यास संबंधित शेतकऱ्यांना पुर्वसूचना नोटीस देऊन अतिक्रमण हटविण्याची नोटीस सामील करावी व कार्यवाही पुर्ण करावी. असे न करता ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. ग्रामपंचायतीने या प्रकरणी योग्य दखल घेऊन स्मशानभूमिवरील शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी चेतन दहिकर, योगेश नाकाडे यांनी केले आहे. (वार्ताहर)
अतिक्रमणाला ग्रा.पं.चे पाठबळ
By admin | Updated: March 20, 2015 00:50 IST