शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा अधिकाऱ्यांचे तक्रारीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील पुरवठा अधिकारी हे तक्रारदारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असून, तिरोडा येथील एका व्यक्तीला हाताशी धरून काम ...

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील पुरवठा अधिकारी हे तक्रारदारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असून, तिरोडा येथील एका व्यक्तीला हाताशी धरून काम करीत आहेत, तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत मागविलेली माहिती देण्यास टाळटाळ करीत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी अधिकारी आणि त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी दिलीप लिल्हारे यांनी अन्न व पुरवठा विभागाचे आयुक्त यांच्याकडे केली आहे. त्यांनीही याची दखल घेत, चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला दिले आहेत.

तिरोडा येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात मागील काही दिवसांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे, तसेच येथील एका गॅस एजन्सीच्या संचालकाशी साठगाठ करून एका खासगी व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप दिलीप लिल्हारे यांनी केला आहे. पुरवठा विभागाला या संदर्भात लिल्हारे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागविली होती. या प्रकरणावर ३१ आगस्ट, २०२० रोजी सुनावणी करण्यात आली होती. तेव्हा संबंधित व्यक्ती १९९५ पासून पुरवठा विभागात कुठल्याच पदावर कार्यरत नसल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, तो अद्यापही याच विभागात बसून कामे करीत असून, स्वस्त धान्य दुकानदारांना फसविण्याची धमकी देत असल्याचा आरोपही लिल्हारे यांनी केला आहे. पुरवठा अधिकारी याची दखल घेत नसल्याचे याची तक्रार तहसीलदारांकडे केली होती, पण दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही त्यांनी या प्रकरणी कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे खोटी माहिती पुरवून दिशाभूल करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लिल्हारे यांनी तक्रारीतून केली आहे. दरम्यान, याची नागपूर विभागाचे पुरवठा विभागाचे उपायुक्तांनी दखल घेत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

............