शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला आणखी २३ हजार डोसेसचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

राज्यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली व या गटातील तरुण-युवक लसीकरणासाठी सरसावले. यामुळे लसीकरणाची आकडेवारी वाढली व लसींचा तुटवडा होऊ लागला. यामुळे राज्यात सर्वत्र लसींच्या पुरवठ्यावर परिणाम झाला व त्यामुळे लसीकरणाला ब्रेक द्यावा लागत होता. परिणामी कित्येकांना केंद्रावर जाऊन परत येण्याची वेळ आल्याचेही दिसले. मात्र आता मागील काही दिवसांपासून लसींचा पुरवठा नियमित होत असून जिल्ह्यातील लसीकरण पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले आहे.

ठळक मुद्देलसीकरण झाले सुरळीत : ५.४४ लाख नागरिकांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील काही दिवसांपासून लसींचा पुरवठा सुरळीत होत असल्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण पु्न्हा सुरळीत सुरू झाले असून आतापर्यंत ५४३९१८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी सायंकाळी जिल्ह्याला आणखी १५००० कोविशिल्ड व ८००० कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात आला. यामुळे शुक्रवारीही लसीकरण होणार आहे. राज्यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली व या गटातील तरुण-युवक लसीकरणासाठी सरसावले. यामुळे लसीकरणाची आकडेवारी वाढली व लसींचा तुटवडा होऊ लागला. यामुळे राज्यात सर्वत्र लसींच्या पुरवठ्यावर परिणाम झाला व त्यामुळे लसीकरणाला ब्रेक द्यावा लागत होता. परिणामी कित्येकांना केंद्रावर जाऊन परत येण्याची वेळ आल्याचेही दिसले. मात्र आता मागील काही दिवसांपासून लसींचा पुरवठा नियमित होत असून जिल्ह्यातील लसीकरण पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले आहे. गुरुवारी जिल्ह्यात सुमारे ४५०० डोस उपलब्ध होते व त्यामुळे आज, शुक्रवारी लसीकरणाला घेऊन भीतीच होती. मात्र गुरुवारी जिल्ह्याला १५००० कोविशिल्ड व ८००० कोव्हॅक्सिन असे एकूण २३ हजार डोस मिळणार होते व त्यासाठी गाडी नागपूरला पाठविण्यात आली होती. यामुळे शुक्रवारी लसीकरणाला ब्रेक देण्याची गरज पडणार नाही. एकंदर लसीकरण सुरळीत होत असल्याने पुन्हा एकदा लसीकरणाला गती आली आहे. 

दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष नको - जिल्ह्यात आतापर्यंत ५४३९१८ नागरिकांचे लसीकरण झाले असून यामध्ये ४३५४५० नागरिकांनी पहिला, तर १०८४६८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच, ५० टक्क्यांपेक्षा कमी नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत आवश्यक असून त्यानंतर आपण सुरक्षित आहोत, अशा स्पष्ट सूचना आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण उशीर न करता दुसऱ्या डोसचा वेळ आल्यास लगेच डोस घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या