शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

दिवाळीच्या खरेदीचा सुपर संडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 21:05 IST

कोरोना गेल्याने निर्बंधमुक्त सण उत्सवांना सुरुवात झाली. त्यामुळे यंदा व्यावसायिकांनीही जादा भांडवल गुंतवून नवीन माल भरला. खरेदीसाठी गोंदियातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लहान दुकानांतही ग्राहकांची गर्दी दिसत आहे. नोकरदारांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकही तालुका स्थळावरील बाजारात येऊन वस्तूंची खरेदी करीत आहेत. यंदा नोकरदार व कामगारांच्या हातात दिवाळीपूर्वीच बोनस पडल्याने बाजारात चैतन्य दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगाेंदिया : धनत्रोयदशीच्या सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.२३) दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी  केली  होती. शहरातील गोरेलाल चौक,दुर्गा चौक, गांधी प्रतिमा,गंज बाजार परिसरातील बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ११ वाजतापासून गर्दी केली होती. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीचा सुपर संडेचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.  कोरोना गेल्याने निर्बंधमुक्त सण उत्सवांना सुरुवात झाली. त्यामुळे यंदा व्यावसायिकांनीही जादा भांडवल गुंतवून नवीन माल भरला. खरेदीसाठी गोंदियातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लहान दुकानांतही ग्राहकांची गर्दी दिसत आहे. नोकरदारांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकही तालुका स्थळावरील बाजारात येऊन वस्तूंची खरेदी करीत आहेत. यंदा नोकरदार व कामगारांच्या हातात दिवाळीपूर्वीच बोनस पडल्याने बाजारात चैतन्य दिसून आले. यंदाच्या दिवाळीला प्रत्येकच कुटुंब कपडे,कापड बाजार सर्वाधिक तेजीत दिवाळीत  सोने खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे गोंदिया सराफा दुकाने सजली. ग्राहक मोठ्या आनंदाने सोने चांदीचे दागिने खरेदी करीत होते.

ग्राहकांच्या गर्दीने फुलले बाजारपेठेतील रस्ते 

- धनत्रोयदशीच्या सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.२३) सोने,कपडे व इलेक्ट्रिक सामानासह इतर वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. सलग सुट्या लागून आल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे ग्राहकांच्या गर्दीने शहरातील रस्ते फुलल्याचे चित्र होते.

चारचाकी वाहने बुक करणारेही वाढले- कोरोनात ऑटोमोबाइल क्षेत्रात मरगळ होती. यंदा दिवाळीनिमित्त चारचाकी वाहने बुक करणाऱ्यांची संख्या वाढली. मोठ्या वाहन कंपन्यांनी सवलतींचा मारा सुरू केला. आता मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा खुळखुळू लागल्याने चारचाकी इलेक्ट्रॉनिक्स व अन्य जीवनावश्यक वाहने खरेदीदारांची संख्या वाहू लागली आहे. वाहने बुक करणे अजूनही सुरूच आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील मरगळ दूर वस्तू खरेदीला प्राधान्य देत आहे होऊ लागल्याची माहिती गोंदिया व्यवसायिकांनी दिली.

आकाश कंदिलांना पसंतीविविध आकारातील पणत्यांबरोबरच मातीचे स्टैंडचे कंदील टांगते दिवे,छोटे नंदादीप विक्रीसाठी उपलब्ध झाले. कागदी, कापडी,काश्मिरी वर्क,कुंदन व भिंगाचे नक्षीकाम असलेले आकाश कंदील तसेच ॲक्रेलिक, प्लास्टिक, पारंपरिक बांबूपासून तयार केलेल्या आकाश कंदिलांची यंदा मागणी आहे.

कपड्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी - कापड व्यावसायिकांना दोन वर्षे नुकसान झेलावे लागले. सर्वच निर्बंध हटल्याने यंदा आशा वाढविल्या. रेडिमेड कापड विक्रीतील तेजी लक्षात घेऊन ठोक व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक केली. कापड व्यवसायात सर्वात मोठी उलाढाल होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये यंदा नावीन्य- इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवापासून पूर्वपदावर आली. सजावटीसाठी नवनवीन वस्तूंची मागणी केल्याने उलाढाल वाढली, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये यंदा नावीन्य दिसून येत आहे.ऑनलाइन शॉपिंग ही वाढली- ग्राहक आता घरूनच ऑनलाइन खरेदी करीत आहेत. खरेदीसाठी वेगवेगळ्या साईटस उपलब्ध झाल्या. त्यांच्याकडून विविध सवलती मिळतात. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022