शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
4
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
5
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
6
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
7
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
8
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
9
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
10
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
11
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
12
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
13
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
14
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
15
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
16
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
17
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
18
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
19
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
20
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले

सौंदड ग्रामीण रुग्णालय झाले पोरके

By admin | Updated: December 6, 2014 01:50 IST

कोणत्याही शासकीय रुग्णालयाशी सर्वसामान्य ग्रामीण नागरिक व गरीब रूग्ण यांचा रोजचाच येतो.

सुखदेव कोरे सौंदड (रेल्वे)कोणत्याही शासकीय रुग्णालयाशी सर्वसामान्य ग्रामीण नागरिक व गरीब रूग्ण यांचा रोजचाच येतो. या बाबीला हेरून शासनाने प्रत्येक तालुक्यात तसेच जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्रामीण रुग्णालयांची स्थापना केली. मात्र सध्या सौंदड येथील ग्रामीण रूग्णालय डॉक्टरांविना पोरके झाल्याचे दिसून येत आहे.सौंदड (रेल्वे) येथे तत्कालिन आ. सेवक वाघाये यांच्या प्रयत्नाने आॅगस्ट २००९ ला शासनाने ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिली. परंतु सदर रुग्णालयाची वास्तव सुरूवात १५ आॅगस्ट २०१३ रोजी झाली. स्थानिक आ. राजकुमार बडोले यांच्या हस्ते सदर ग्रामीण रुग्णालयाचे थाटात उद्घाटन झाले. त्या दिवसापासून सदर ग्रामीण रुग्णालय नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले. डॉक्टरांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे तसेच कार्यालयीन वेळेत रुग्णालयात उपस्थित न राहणे, वेळेवर उपचार न करणे, रात्रपाळीत एकही डॉक्टर रुग्णालयात नसणे, असे अनेक प्रकार या रुग्णालयात होत आहेत. त्यामुळे रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक जि.प. सदस्य, पं.स. उपसभापती यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण गरीब जनता होरपळली जात असून मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक फटका बसत आहे. सदर ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या तत्काळ सोडविण्यात न आल्यास सौंदड ग्रामवासी सर्वदलीय मोर्च्याचे आयोजन करून आमरण उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे. मागील आठ दिवसांपासून सौंदड ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर हजर नसून रुग्णांना आल्यापावली परत जावे लागत आहे. २८ नोव्हेंबरला सदर प्रतिनिधी, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सदाशिव विठ्ठले व सौंदड येथील विविध युवक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली असता तेथे संपूर्ण बेबंदशाही दिसून आली. रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे दिसून आले. रुग्णालयात फक्त औषधी निर्माता व तंत्रज्ञ, चार परिचारिका, वाहन चालक, एक परिचर, डी.ई.ओ., एक शिपाई, सफाई कामगार यांच्याशिवाय इतर सर्व नियुक्त कर्मचारी अनुपस्थित होते. त्यावेळी २४ रुग्ण डॉक्टरांची वाट बघत ताटकळत बसले होते. या २४ रुग्णांपैकी निखील यावलकर, सुखराम टांगले, ग्रा.पं. सदस्य नंदकिशोर डोंगरवार यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे दिसून आले. इतर २१ रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत बेंचवर असल्याचे निदर्शनास आले. तसेच रुग्णालयाच्या ओपीडीसाठी एनआरएचएम चमूतील कंत्राटी डॉक्टर उपस्थित होते. एवढे मोठे ग्रामीण रुग्णालय एका कंत्राटी डॉक्टरच्या भरवश्यावर कसे काय चालविले जात आहे, हे कळायला मार्ग नाही. ग्रामीण जनतेचा आता पक्का समज झाला आहे की, ग्रामीण रुग्णालयापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्र लाख मोलाचा होता. जोपर्यंत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होते, तेव्हा रुग्णांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागत नसे. त्यांचा वेळेवर उपचार होत असे, डॉक्टर व सर्व कर्मचारीसुद्धा उपस्थित राहत होते. मात्र आता गैरसोय होवून रूग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत ग्रा.पं. चे सदस्य कैलास जांभूळकर यांनी स्थानिक आ. राजकुमार बडोले यांना भ्रमणध्वनीवरून रुग्णालयाच्या कारभाराविषयी अवगत केले, तेव्हा त्यांनी मी काय करू शकतो, तुम्ही आपल्या स्तरावर हे प्रकरण हाताळा, अशा शब्दात उत्तर दिले. स्थानिक जि.प. सदस्य व पं.स. सदस्य यांनीसुद्धा या समस्येकडे पाठ फिरवली आहे. यामुळे जनतेत लोकप्रतिनिधींविरूध्द असंतोष पसरलेला असून जनता खवळलेली आहे. सदर रुग्णालयाच्या गैरसोयीकडे तातडीने लक्ष घालून डॉक्टरांची व इतर मूलभूत सोयींची व्यवस्था न केल्यास या रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील जनता व सर्वदलीय मोर्चा काढून आमरण उपोषण करण्यात येईल, असे स्थानिक जनतेने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.