शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार हेक्टरमध्ये उन्हाळी भात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:25 IST

जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगावचे ५ हजार १२७ हेक्टर आहे.

ठळक मुद्देअर्जुनी-मोरगावमध्ये सर्वाधिक ५१२७ हेक्टर : खरिपाने जागवली शेतकऱ्यात आशा

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगावचे ५ हजार १२७ हेक्टर आहे.यंदा पावसाने शेतकऱ्यांना वेळीच साथ दिल्याने खरिपाचा हंगाम भरभरून निघाला. कधी नव्हे एवढे धानाचे उत्पादन यंदा झाले असून शेतकरी चांगलाच खुश दिसत आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या खेळीने हतबल होवून बसलेला शेतकरी खरिपाच्या निकालाने आता जोमात असून त्यांच्यात नवी आशा निर्माण झाली आहे.जिल्ह्यात यंदाही सिंचनाची सोय नसतानाही शेतकरी आहे त्या साधनांतून उन्हाळी घेण्याची तयारी दाखवित आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी दिले जात नसतानाही सिंचनाची सोय असलेले शेतकरीच उन्हाळीसाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. तरिही एवढ्या मोठ्या क्षेत्रात उन्हाळी लागवड करण्यात आल्याने खरिपासोबतच आता उन्हाळीही शेतकºयांना भरभरून पावणार असल्याचे दिसते.विशेष म्हणजे, जिल्हयात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधीक ५ हजार १२७ हेक्टर क्षेत्रात उन्हाळीची भाताची लागवड करण्यात आली आहे. तर गोरेगाव तालुक्यात सर्वात कमी १ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी आहे.तिपटीने उन्हाळीच्या क्षेत्रात वाढजिल्ह्यात ७ हजार ७६० एवढे उन्हाळीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. म्हणजेच, किमान एवढ्या क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड अपेक्षीत असते. मात्र यंदा तिपटीने म्हणजेच २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. यावरून धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षींपासून लागलेली अवकळा लोपली असल्याचे म्हणता येईल. यंदा खरिपाने शेतकऱ्यांना ‘छप्पर फाडके’ दिले असतानाच उन्हाळीही भरभरून निघाल्यास धानाचे कोठार पुन्हा एकदा भरभरून निघणार.बोअरवेलचे खोदकाम वाढलेप्रकल्पांतील पाण्याची स्थिती व उन्हाळ््यातील पाण्याची गरज लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने शेतीसाठी पाणी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशात ज्यांच्याकडे स्वत:ची सिंचनाची सोय आहे तेच उन्हाळी घेत आहेत. शिवाय शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून आता शेतकरी बोअरवेल खोदकामाकडे वळला आहे. यामुळे मात्र आता भूगर्भातील पाण्याची पातळीही झपाट्याने खालावणार यात शंका नाही.