शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी हंगामाने रेल्वे मालामाल

By admin | Updated: June 10, 2015 00:42 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया एक महत्त्वपूर्ण स्थानक असून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे म्हणून ख्यातीप्राप्त ...

गतवर्षीची तुलना : एप्रिल-मे महिन्यात ५२ लाखांनी वाढले उत्पन्नदेवानंद शहारे गोंदियादक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया एक महत्त्वपूर्ण स्थानक असून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे म्हणून ख्यातीप्राप्त झाले आहे. गतवर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यांत या स्थानकावरून १२ लाख ६८ हजार ३५० प्रवाशांनी केला. यंदा याच दोन महिन्यात प्रवासी संख्येत तब्बल २२ हजार ११८ ची भर पडली असून रेल्वेला उत्पन्नात ५२ लाखांची भर पडली आहे.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया स्थानक जंक्शन असून चारही दिशांना रेल्वेगाड्या धावतात. गोंदियावरून नागपूरच्या दिशेने, रायपूरच्या दिशेने, चंद्रपूरच्या दिशेने व बालाघाटच्या दिशेने अनेक प्रवाशी गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे गोंदिया स्थानक नेहमीच गजबजलेले दिसते. या स्थानकावरून दररोज जवळपास २० प्रवाशी आपला प्रवास करतात तर एवढेच प्रवाशी या स्थानकावर उतरतात. त्यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर गोंदिया स्थानक झोनमधून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे ठरले आहे.एप्रिल २०१४ मध्ये गोंदिया स्थानकातून एकूण पाच लाख ९५ हजार ७७६ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे दोन कोटी ९४ लाख ३१ हजार ७८८ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर एप्रिल २०१५ मध्ये एकूण पाच लाख ८७ हजार २२८ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे तीन कोटी २३ लाख तीन हजार ३३० रूपयांचे उत्पन्न मिळाले. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या नोंदीप्रमाणे, गतवर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा एप्रिल २०१५ मध्ये तब्बल आठ हजार ५४८ प्रवासी घटले तरीसुद्धा उत्पनात मात्र २८ लाख ७१ हजार ५४२ रूपयांची भर पडली.मे २०१४ मध्ये गोंदिया स्थानकातून सहा लाख ७२ हजार ५७४ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे तीन कोटी ६४ लाख १७ हजार ७२३ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. मे २०१५ मध्ये सात लाख तीन हजार २४० प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे तीन कोटी ८८ लाख नऊ हजार ५७० रूपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या मे महिन्यापेक्षा यावर्षीच्या (२०१५) मे महिन्यात तब्बल ३० हजार ६६६ प्रवाशांची भर पडली. त्यातून गतवर्षीच्या मे पेक्षा यावर्षी २३ लाख ९१ हजार ८४७ रूपयांचे अधिकचे उत्पन्न गोंदिया स्थानकाला मिळाले. दोन महिन्यांचे उत्पन्न ७.११ कोटीसन २०१४ च्या एप्रिल व मे या दोन महिन्यांत १२ लाख ६८ हजार ३५० लोकांनी गोंदिया स्थानकातून प्रवास केला होता. त्याद्वारे सहा कोटी ५८ लाख ४९ हजार ५११ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. सन २०१५ च्या एप्रिल व मे या दोन महिन्यांत १२ लाख ९० हजार ४६८ लोकांनी प्रवास केला असून त्याद्वारे सात कोटी ११ लाख १२ हजार ९०० रूपयांचे उत्पन्न मिळाले. यावर्षी या दोन महिन्यात २२ हजार ११८ उन्हाळी प्रवाशांची संख्या वाढली असून उत्पन्नसुद्धा तब्बल ५२ लाख ६३ हजार ३८९ रूपयांनी वाढले.