गोंदिया : मकरसंक्र ांतीनंतर जीवनात गोडवा आणणारा सण म्हणून होळीची ओळख आहे. मागील वर्षी दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह इतरही वस्तू महागल्या होत्या. त्यामुळे होळीच्या सणावर कडवट रु प काहीशा प्रमाणात आले होते. परंतु यंदा साखर गाठ्यांच्या किंमतीत घसरण झाल्याने होळी सणानिमित्त का होईना ग्राहकांसाठी अच्छे दिन आले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होळी व धूलिवंदन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने बाजारपेठाही सजल्या आहेत. निळ््या, लाल व शुभ्र रंगाच्या गाठ्या बाजारातील दुकानांमध्ये सजल्याने दुकाने अधिकच खुलून दिसत आहेत. ग्रामीण भागातून अनेक लोक गाठ्या खरेदी करण्याकरिता येत आहेत. कमी भावात गाठ्यांची खरेदी करणे हा एकमेव उद्देश आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठेत होळी व धुळिवंदन निमित्त दोन्ही कडांनी दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे गाठ्यांची विक्र ी दरवर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी होईल असा आशावाद येथील गाठ्याविक्र ेते व्यक्त करीत आहेत.होळीच्या आठ दिवसांपूर्वी पासूनच बाजारात गर्दी झाल्याने व्यावसायिकांच्या वस्तूंची विक्र ी होत आहे. विशेष म्हणजे साधारण गाठ्यांसह वेगवेगळ््या आकार व ठपक्यांच्या गाठ्या ग्राहकांना आकर्षित करीत आहे. बाजारात सध्या लहान ठपक्यांच्या तसेच मोठे पदक असलेल्या गाठ्या दिसून येत आहेत. यातील साधारण व लहान ठपक्यांच्या गाठ्या ८० रूपये प्रति किलो दराने तर मोठ्या पदकांंच्या गाठ्या १२० व ७० रूपये दराने विकल्या जात आहेत. (शहर प्रतिनिधी)
साखरगाठ्यांनी सजली बाजारपेठ
By admin | Updated: March 2, 2015 01:31 IST