शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कल्याण अभियान यशस्वीपणे राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:17 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने कृषी कल्याण अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी जोमाने प्रयत्न करावेत, असे निर्देश नवी दिल्ली येथील धोरण विभागाच्या केंद्रीय सहसचिव डॉ.नमिता प्रियदर्शी यांनी सर्व विभागांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने कृषी कल्याण अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी जोमाने प्रयत्न करावेत, असे निर्देश नवी दिल्ली येथील धोरण विभागाच्या केंद्रीय सहसचिव डॉ.नमिता प्रियदर्शी यांनी सर्व विभागांना दिले.येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी कल्याण अभियानांतर्गत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी प्रामुख्याने नागपूरचे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.प्रज्ञा गोलघाटे उपस्थित होते. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आयुक्त डॉ.वाय.एस.वंजारी, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, विषय विशेषज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, डॉ.विक्रम कदम, डॉ.ए.आर.पडोळ, पशुधन विकास अधिकारी डॉ.जी.एस.काटवे, प्रशांत ढवळे, किरण वझाडे, श्रीकांत कापगते, सचिन सातपुते, सतीश पुरकमवार, प्रतिभा चौधरी, डॉ.देवेंद्र मुनघाटे, केवळराम सालोटकर, राजेश वाणी, मंगेश चापले, संजय चौधरी, कोमेश रंधये आदी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ.नमिता प्रियदर्शी यांनी कृषी कल्याण अभियान भाग १ व २ चा संपूर्ण आढावा घेतला. आकांक्षित जिल्ह्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम, कृषीनिविष्टा, नाडेप पद्धती याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. कृषी कल्याण अभियानांतर्गत राबविण्यात आलेले शेतकरी प्रशिक्षण, कृषीनिविष्टा वाटप, सर्वोत्कृष्ट लसीकरण, नाडेप पद्धती, ठिबक सिंचन यासाठी गडचिरोली जिल्ह्याला सातवा क्रमांक मिळाल्यामुळे त्यांनी सर्व विभागाचे कौतुक केले. तसेच कृषी कल्याण अभियानांतर्गत सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना केल्या.या बैठकीत कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे यांनी कृषी कल्याण अभियान भाग १ व भाग २ चे सादरीकण केले. कृषी कल्याण अभियानाची रूपरेषा उपस्थितांना सांगिंतली. आढावा बैठकीला कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय सहसचिव डॉ.नमिता प्रियदर्शी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतलागवड पद्धत व इतर बाबींची माहिती संबंधित विभाग प्रमुखांकडून जाणून घेतली.गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये शेती लागवड पद्धती, यांत्रिकीकरण, शेतीची उत्पादकता व इतर बाबींची जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने २ आॅक्टोबर ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियान भाग २ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय सहसचिवांनी ही आढावा बैठक गडचिरोलीत घेतली.कार्यक्रमाचे संचालन ज्योती परसुटकर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर ताथोड यांनी मानले.ठिबक सिंचन, पेरू पीक व गांढूळ खत प्रकल्पाला दिली भेटभारत सरकारच्या केंद्रीय सहसचिव डॉ.नमिता प्रियदर्शी यांनी गडचिरोली येथील मुक्त संचार गोठा प्रकल्प, नाडेप कम्पोस्ट युनिट, ठिबक सिंचन प्रकल्प, पेकल्पाच्या तंत्रज्ञानाविषयीची माहिती प्रियदर्शी यांनी जाणून घेतली. कृषी कल्याण अभियानांतर्गत तालुक्यातील गोगाव व सर्च येथे भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली. यावेळी गोगाव येथील शेतकऱ्यांना त्यांच्या रू पीक प्रात्यक्षिक प्रकल्प तसेच गांढूळ खताला भेटी देऊन याबाबतची माहिती जाणून घेतली. सदर प्रहस्ते कृषीनिविष्ठांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत नागपूरच्या विभागीय कृषी अधिकारी डॉ.प्रज्ञा गोलघाटे उपस्थित होत्या. जिल्ह्यातील कृषी व आत्मा विभागाच्या अधिकाºयांकडून त्यांनी विविध प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.

टॅग्स :Agricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्र