शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या उपोषणाची यशस्वी सांगता

By admin | Updated: February 14, 2016 01:42 IST

शेतकरी मंगलमूर्ती येरणे यांच्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील धावून आले.

कृषी अधीक्षकांकडून मदत : येरणे यांना दिला ७.९१ लाखांचा धनादेश

अर्जुनी मोरगाव: शेतकरी मंगलमूर्ती येरणे यांच्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील धावून आले. त्यांनी तातडीने ७ लाख ९१ हजार रूपयांचा धनादेश येरणे यांना दिला. थकित असलेल्या ज्या रकमेसाठी येरणे यांचे ५ तारखेपासून उपोषण सुरू होते, ती रक्कम मिळताच येरणे यांनी शुक्रवारी (दि.१२) आपले उपोषण मागे घेतले. सन २०१२-१३ मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड योजनेसाठी शेतकरी येरणे (आसोला) यांनी आपल्या रोपवाटीकेतून आंबा व सागवानची सात लाख ९१ हजार ७९३ रूपये किमतीची रोपटी पुरविली होती. येरणे यांना रोपट्यांचे पैसे देण्यात यावे यासाठी रोपवाटीकाधारकांच्या मापन पुस्तकेत नोंदी घेऊन बील तालुका कार्यक्रम अधिकारी (तहसीलदार) यांच्याकडे २३ जानेवारी २०१३ रोजी कृषी विभागाकडून पाठविण्यात आले होते. पैशांसाठी येरणे यांनी कित्येकदा कार्यालयाच्या चकरा मारल्या, मात्र मागील चार वर्षांपासून येरणे यांच्या हाती त्यांचा पैसा आला नाही. अखेर थकून असलेल्या आपल्या रकमेसाठी येरणे यांनी ५ तारखेपासून शेतातच अन्नत्याग आंदोलन सुरू केले. तसेच आत्महत्येचा इशाराही दिला होता. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी येरणे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र येरणे यांनी निर्णयावर ठाम असल्याचे सांगून त्यांना परतावून लावले. अखेर त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी शुक्रवारी (दि.१२) दुपारी येरणे यांची भेट घेतली व त्यांच्या हातात सात लाख ९१ हजार रूपयांचा धनादेश व रोख ८०० रूपये दिले व भाकर-ठेचा चारून त्यांच्या उपोषणाची सांगता केली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी तुमडाम, विजय पेशट्टीवार, मंडळ कृषी अधिकारी ऋषी चांदेवार, अविनाश हुकरे, राकेश नागपुरे, दिलीप चित्रीव, प्रकाश येरणे, गुलाब येरणे प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)