शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गोंदिया जिल्ह्यात काळी मिरी लागवडीचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 18:54 IST

Gondia News आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील बागेत डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी आंब्याच्या बागेत काळीमिरी लावण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.

ठळक मुद्देबोरकन्हार येथे लावली काळीमिरी

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : मिरे किंवा काली मिर्च उत्पादनासाठी गोंदिया जिल्ह्याचे हवामान योग्य आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी दिली आहे. मिरी किंवा काळी मिर्चचे उत्पादन भारतात मुख्यतः केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात कोकण, आसाम व पश्चिम बंगालमध्ये घेतले जाते. काळीमिरीच्या झाडांच्या योग्य वाढीसाठी दमट व उष्ण हवामानाची गरज असते. आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील बागेत डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी आंब्याच्या बागेत काळीमिरी लावण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. (Successful experiment of black pepper cultivation in Gondia district)

काळीमिरीकरिता १८ ते ३८ डिग्री सेंटिग्रेडपर्यंत तापमान अधिक लागते. भरपूर पाऊस व तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात धानाचे रब्बी पीकसुद्धा घेतात. यामुळे या जिल्ह्यात दमट हवामान साधारणतः एप्रिल महिन्यापर्यंत असते. डॉ. भुस्कुटे यांची २५ वर्षे जुनी आंब्याची बाग आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार या गावात आहे. आंबा हा वृक्ष सदाहरित असून उन्हाळ्यातदेखील ही झाडे थंडावा देतात. दोन वर्षांपूर्वी डॉ. भुस्कुटे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून मिरीची कलमे आणली. आंब्याच्या झाडांच्या बुंध्यापाशी लावली. उन्हाळ्यात पाणी व्यवस्था करून या झाडांची योग्य काळजी घेतली. काळेमिऱ्याचे उत्पादन आपल्या भागात होऊ शकते का, या विचाराने प्रयोगाला सुरुवात केली. आंब्याच्या झाडाचा आधार घेत मुळाद्वारे वाढली. ती मिरे वरच्या फांद्यांपर्यंत पोहोचली. या वर्षी या मिरी लागली आहेत. दोन वर्षांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.

आपल्या भागात ज्या शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागा आहेत त्यांनी काळेमिरे लागवडीचा प्रयोग केला पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पादन मिळेल. काळेमिऱ्याचा भाव ४०० रुपये प्रति किलो आहे. याचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच परसदारात आंब्याची झाडे असल्यास घरीदेखील मिरीचा वेल लावता येईल.

डॉ. श्रीराम भुस्कुटे, माजी प्राचार्य तथा वनस्पतीशास्त्रज्ञ

टॅग्स :agricultureशेती