शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

मोरवाही येथील आंदोलनाची यशस्वी सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:00 IST

मागील २५ दिवसांपासून येथे बुद्ध विहार बांधकामासाठी तसेच दोषी असलेल्या गावातील पवन हेमने, चंद्रभान ठाकूर व राजू ब्राह्मणकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी येथील बौद्ध बांधवांचे धरणे आंदोलन सुरु होते. हे आंदोलन सुरू असतानाच आरोपी असलेल्या तिन्ही व्यक्तींनी आंदोलनस्थळी गणपती बसविण्याचे कारण पुढे करून आंदोलनकर्त्यांशी वादाला  सुरुवात केली. त्यातच सोमवारी (दि. ६) पोळ्याच्या रात्री शे-दोनशे लोकांना जमवून त्यांनी आंदोलन मंडप उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बौद्ध समाज बांधवांचे बुद्धविहाराच्या मागणीसाठी १२ ऑगस्टपासून धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन शांततेत सुरू असतानाच सोमवारी (दि. ६) रात्री येथील काही लोकांनी आंदोलन मंडपावर हल्ला करीत नासधूस केली. परंतु पोलीस विभागाने चोख बंदोबस्त लावून गावगुंडांना आवरल्यामुळे पुढील अनर्थ  टळला.  त्यातच मंगळवारी (दि. ७) जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे हजेरी लावत कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे  तूर्तास २५ दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन समितीतर्फे मागे घेण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.मागील २५ दिवसांपासून येथे बुद्ध विहार बांधकामासाठी तसेच दोषी असलेल्या गावातील पवन हेमने, चंद्रभान ठाकूर व राजू ब्राह्मणकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी येथील बौद्ध बांधवांचे धरणे आंदोलन सुरु होते. हे आंदोलन सुरू असतानाच आरोपी असलेल्या तिन्ही व्यक्तींनी आंदोलनस्थळी गणपती बसविण्याचे कारण पुढे करून आंदोलनकर्त्यांशी वादाला  सुरुवात केली. त्यातच सोमवारी (दि. ६) पोळ्याच्या रात्री शे-दोनशे लोकांना जमवून त्यांनी आंदोलन मंडप उधळून लावण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिथे उपस्थित पोलिसांनासुद्धा धक्काबुक्की करीत सरपंच राधेश्याम भिमटे यांना मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. मात्र पुढे कोणताही अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांनी संयमाची भूमिका घेत त्यांना पळवून लावले. त्यातच सदर प्रकरण पुढे वाढू नये व समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी मंगळवारी (दि.७) जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले,  उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, गटविकास अधिकारी खोटोले, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र खोब्रागडे, व स्वतः पोलीस अधीक्षक उपस्थित झाले. एवढी मोठी घटना घडूनही येथील ग्रामसेवक ललित सोनवणे हे बेपत्ता असल्याने त्यांच्या कार्यशैलीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केला.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे 

- गावात आलेल्या अधिकाऱ्यांनी २ दिवसांत दोषी असलेल्या सर्व अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन व तिन्ही कंत्राटदारांवर कारवाईचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर येथील बौद्ध समाजबांधवांनी तूर्तास आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

टॅग्स :agitationआंदोलन