शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

मदतनिधी त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:19 IST

एकीकडे शासन शेतकऱ्यांना मदत केली असल्याची घोषणा करीत आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी पोहोचला नाही. ही बाब आमदार संजय पुराम यांना कळताच त्यांनी महसूल विभाग आणि बँक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसमोर उभे करुन त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी जमा करण्याचे निर्देश दिले. अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे ठणकावून सांगितले.

ठळक मुद्देपुराम यांचे निर्देश : शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : एकीकडे शासन शेतकऱ्यांना मदत केली असल्याची घोषणा करीत आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी पोहोचला नाही. ही बाब आमदार संजय पुराम यांना कळताच त्यांनी महसूल विभाग आणि बँक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसमोर उभे करुन त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी जमा करण्याचे निर्देश दिले. अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे ठणकावून सांगितले.ग्राम हलबीटोला येथील श्री अर्धनारेश्वरालय येथे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित झाले होते. यात पीक कर्ज वाटपाबद्दल मार्गदर्शन तसेच विविध विषयांवर माहिती देण्यासाठी आमदार संजय पुराम, तहसीलदार प्रशांत सांगळे, पं.स. उपसभापती दिलीप वाघमारे, पं.स. सदस्य प्रतिमा परिहार, बी.डी.ओ. अशोक खाडे, तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, भाजपा तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, मनोज बोपचे, शंकर मडावी तसेच विविध बँकांचे संचालक, व्यवस्थापक व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकातून तहसीलदार सांगळे यांनी, शेतकºयांसाठी विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी बँक व्यवस्थापकांनी बँकेतून मिळणाऱ्या कर्जाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांनी बँक अधिकाºयांची सारवासारवची भाषा ऐकून संताप व्यक्त केला. तसेच आ. पुराम यांचा शेतकऱ्यांनी त्यांचा घेराव करीत आपापल्या समस्यांचा पाढा वाचला. आ.पुराम यांनी शेतकºयांच्या समस्या ऐकून शासनाच्या विविध योजनांतून मिळणारे अनुदान, पीक कर्ज इत्यादीबद्दल मार्गदर्शन केले.या पीक कर्ज मेळाव्यात जवळपास १८ शेतकऱ्यांना जागेवर पीक कर्ज वाटप करून प्रमाणपपत्र देण्यात आले. खरीप पीक कर्जाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये नवेगाव येथील रामजी दमाहे हे प्रथम मानकरी ठरले. त्यांना आ. पुराम यांच्या हस्ते कर्ज वाटप प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संचालन करून आभार नायब तहसीलदार खाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर सहाय्यकांनी सहकार्य केले.बँक व्यवस्थापकांचा खोटेपणा उघडदरम्यान आ. पुराम यांना माहीत झाले की महसूल विम्यात आणि बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी पोहोचला नाही. तसेच नवीन पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. तेव्हा आ.पुराम यांनी महसूल कर्मचारी आणि बँक अधिकाऱ्यांना, येत्या काही दिवसांत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली पाहिजे, असे निर्देश दिले. या वेळी काही बँक व्यवस्थापकांनी रक्कम जमा केल्याची खोटी माहिती देत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्या खोटेपणा उघड करून दिला. अशात ते थातुरमातुर माहिती देऊ लागले. त्यांच्यामध्ये काम करण्याबाबत समन्वयाचा अभाव आढळून आला.