शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होणार आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समिती १०६, नगरपंचायतच्या ५१ आणि ६४ ग्रामपंचायतींसाठी येत्या २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ६ डिसेंबर तर नगरपंचायतींसाठी ७ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. १३ डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चारही निवडणुकांसाठी बुधवारपासून (दि. १) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समिती १०६, नगरपंचायतच्या ५१ आणि ६४ ग्रामपंचायतींसाठी येत्या २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ६ डिसेंबर तर नगरपंचायतींसाठी ७ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. १३ डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. १४ डिसेंबरपासून निवडणुकीसाठी प्रचाराचा रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी गर्दी कमीच राहण्याची शक्यता आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित झाले नसून सध्या उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी होण्याची शक्यता आहे. तर हीच स्थिती नगरपंचायत निवडणुकीसाठी कायम राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेणार असल्याने जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. मुलाखतींचे सत्र जोरात, उमेदवार निवडताना लागतोय कस - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची यादी सर्वच पक्षांत मोठी आहे. यासाठी अनेकांनी मागील सहा महिन्यांपासून पक्ष नेतृत्वाकडे फिल्डिंग लावून ठेवली होती. त्यातच मंगळवारपासून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली. एक एका जागेसाठी आठ ते दहा उमेदवार इच्छुक असल्याने नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्न पक्षांच्या नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. इनकमिंग व आऊट गोईंग जोरात - निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याचे पाहून अनेकांनी आहे त्या पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांत सध्या इनकमिंग आणि आऊट गोईंगचे वारे जोरात सुरू आहे. दररोज अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत. 

फुलचूर जिल्हा परिषद क्षेत्रात होणार दिग्गजांची लढत - गोंदिया शहरालगत असलेल्या फुलचूर जिल्हा परिषद जनरल असल्याने या क्षेत्रातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची यादीदेखील लांब आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदाराचा पुतण्या सुद्धा या ठिकाणाहून निवडणूक लढणार असल्याचे बोलल्या जाते. तर भाजपाकडून संजय टेंभरे आणि राजेश चतुर हे दावेदार मानले जाते आहे. यापैकी कुणाला तिकिट मिळते याकडे लक्ष आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा तगड्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद