शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष बागेला उन्हाळा पडणार भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2017 00:59 IST

येथील सुभाष बागेत पाण्याची योग्य ती व्यवस्था नसल्याने पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे.

पाण्याची व्यवस्था नाही : दरवर्षी आटतात विहिरी, बोअरवेलची मागणी कपिल केकत   गोंदिया येथील सुभाष बागेत पाण्याची योग्य ती व्यवस्था नसल्याने पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे. आता विहीरीने काम कसे-बसे निघत असले तरी उन्हाळ््यात विहीरही आटते. अशात मात्र बागेत ‘कोरड’ पडणार व झाडांना पाणी देणे संभव होणार नाही. करिता बगिचा प्रशासनाकडून एका बोअरवेलची मागणी केली जात आहे. मागील वर्षापासून यासाठी पत्र दिले असून आतापर्यंत बोअरवेल मिळालेली नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा सुभाष बागेसाठी भारी जाणार असल्याचे दिसते. शहरात आज फक्त सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हेच एकमेव बाग उरले आहे. दिवसभर कामाच्या थकव्यानंतर झाडांच्या सावलीत बसून निवांत वेळ घालविण्यासाठी वृद्धांपासून तरूण मंडळीही बागेत येते. हिरव्यागार झाडांच्या सावलीत बसून आपला काही वेळ घालविण्यासाठी शहरवासीयांची बागेत गर्दी होते. शहरातील एकच बाग असल्याने चिमुकल्यांचीही येथील खेळणे व हिरवळीवर खेळण्यासाठी गर्दी असते. अवघ्या शहरातील नागरिकांची बागेकडेच धाव असते. त्यातही उन्हाळ््यात शाळांच्या सुट्या लागल्यानंतर चिमुकल्यांसह पालकही बागेत येतात व बागेत पाय ठेवायला जागा उरत नाही. या बागेतील हिरवळीसाठी बागेत दोन विहिरी व एक बोअरवेल आहे. मात्र उन्हाळ््याच्या सुरूवातीपासूनच या विहिरी आटतात. शिवाय बोअरवेल मागील तीन-चार वर्षांपासून बंद पडून असल्याची माहिती आहे. त्यामुळे उन्हाळ््यात झाडांना पाणी द्यावे कसे अशा प्रश्न सध्या बगिचा प्रशासनापुढे उभा आहे. पाण्याची ही समस्या सुटावी यासाठी प्रभारी बगिचा निरीक्षक प्रवीण मिश्रा यांनी नगर परिषदेकडे एका बोअरवेलची मागणी केली आहे.विहिरी आटल्यास बोअरवेलद्वारे पाणी देता येईल असा त्यांचा या मागचा हेतू आहे. मात्र त्यांच्या मागणीवर अद्याप तरी काहीच निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. एक बोअरवेल मिळाल्यास बागेतील पाण्याची समस्या सुटणार. मात्र अशा या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.अशात यंदा बागेला बोअरवेल मिळाली नाही तर यंदाचा उन्हाळा सुभाष बागेसाठी भारी जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.