शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष बाग येणार सीसीटीव्हीच्या निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 02:19 IST

शहरातील एकमेव सुभाष बागेत काही गैरप्रकार घडू नये या दृष्टीने बागेत सीसीटिव्ही कॅमेरे लावून निगराणीत ठेवण्यात येणार आहे.

नववर्षातील पहिली आमसभा : सर्व विषयांना मंजुरीगोंदिया : शहरातील एकमेव सुभाष बागेत काही गैरप्रकार घडू नये या दृष्टीने बागेत सीसीटिव्ही कॅमेरे लावून निगराणीत ठेवण्यात येणार आहे. या वर्षातील नगर परिषदेची पहिलीच आमसभा मंगळवारी (दि.१२) पार पडली. या आमसभेत त्यासंदर्भातील ठराव सर्वानुमते घेण्यात आला. नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या अध्यक्षतेत व मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या सभागृहात ही आमसभा पार पडली. एकूण ३५ विषयांवर ही आमसभा बोलविली होती. यामध्ये महत्वाचे म्हणजे, शहरात आजघडीला सुभाष बाग ही एकमेव बाग असून येथे महिला व पुरूषांची चांगलीच गर्दी असते. या बागेत काही गैरप्रकारही घडत असल्याने या गैरप्रकारांवर आळा बसावा यासाठी बगिचा विभागाकडून बागेत सीसीटिव्ही लावण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याशिवाय वाढती महिला व पुरूषांची गर्दी बघता बागेत सहा शौचालय बांधकाम, विद्युत व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी एक लाईनमेनची नियुक्ती व पावसाळ््यात नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था याबाबत प्रस्ताव मांडण्यात आले होते. आजघडीला बागेचे महत्व लक्षात घेत या सर्व प्रस्तावांना सभेत मंजूरी देण्यात आली. स्टेडियम परिसर किंवा सुभाष बागेत लालबहादूर शास्त्री व संत गाडगे महाराजांची प्रतिमा लावण्याबाबतच्या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आली. याशिवाय नगरोत्थान योजना, दलितोत्तर योजना, रस्ता अनुदान योजना, दलीत वस्ती सुधार योजना तसेच बांधकाम विभागाकडून प्रस्तावित कमी दराच्या निविदांनाही सभेत मंजुरी देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)