शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

लेखणीतून समाजाचे प्रतिबिंब दिसते

By admin | Updated: August 19, 2015 02:07 IST

पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजाला घडविण्याचे काम पत्रकार करतात. विविध प्रकारच्या समस्या व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ...

पालकमंत्री बडोले : श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळागोंदिया : पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजाला घडविण्याचे काम पत्रकार करतात. विविध प्रकारच्या समस्या व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीतून करतात. पत्रकारांच्या लेखणीतून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.स्वातंत्र्यदिनी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर, जि.प.चे सभापती पी.जी. कटरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अफताफ शेख होते.गोंदियातील पत्रकार भवनाचा प्रश्न बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी लवकरच तोडगा काढून पत्रकार भवनाचा मुद्दा सोडविण्यात येईल, असे बडोले म्हणाले.पत्रकारांनी विधायक स्वरुपाची टीका लेखणीतून करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अतिथींच्या हस्ते यावर्षीच्या टिळक गौरव पुरस्कार महेश अग्रवाल, स्व. मनोहरभाई पटेल संपादकीय पुरस्कार उदय चक्रधर, स्व. संतोष अग्रवाल स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार खेमेंद्र कटरे व ओमप्रकाश सपाटे यांना देण्यात आला. स्व. शंकरलाल अग्रवाल उत्कृष्ट वृत्तवाहिनी प्रथम पुरस्कार हरिश मोटघरे, द्वितीय पुरस्कार अभय अग्रवाल, स्वातंत्र्य सैनिक स्व. हिरालाल जैन, उत्कृष्ट विकास वार्ता प्रथम पुरस्कार बिसेन व भरत घासले, द्वितीय पुरस्कार दिलेश्वर पंधराम व भोला गुप्ता, उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार शुभम ढोमणे यांना देण्यात आला. सर्वांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी १० वी १२ वी च्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचाही अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. पत्रकारांच्या पाल्यांमध्ये हर्षा आर्य, मेमन मोहम्मद यासीम शेख तर १२ वीच्या परीक्षेतील तेजश्री बालपांडे, हरेंद्रजित अरोरा, मीत हरिणखेडे, वैष्णवी शेंडे, श्रेयश वैद्य, ख्याती पलन, प्रांजल राऊत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)