शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 21:58 IST

दररोज आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. निसर्गात घडणाऱ्या घटनांविषयी उत्सुकता बाळगणे व ते जाणून घेण्याची उत्कंठा शिगेला पोहोचणे यातूनच विज्ञानाची निर्मिती होते. अनादी काळापासून विज्ञान हे सर्वव्यापी आहे.

ठळक मुद्देगजानन पांडे : आदर्श विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : दररोज आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. निसर्गात घडणाऱ्या घटनांविषयी उत्सुकता बाळगणे व ते जाणून घेण्याची उत्कंठा शिगेला पोहोचणे यातूनच विज्ञानाची निर्मिती होते. अनादी काळापासून विज्ञान हे सर्वव्यापी आहे. ते जाणून घेण्यास आपण सक्षम असले पाहिजे. आपल्या पूर्वजांकडून प्रतिजैविक तयार करण्याची परंपरा आजही सुरु आहे. सर्व विद्यार्थ्यांनी त्याकरिता वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा, असे प्रतिपादन ग्राम कुºहाडी येथील रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक गजानन पांडे यांनी केले.येथील आदर्श विद्यालयात बुधवारी (दि.२७) आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्यात ते बोलत होेते. उद्घाटन माजी आमदार केशवराव मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, प्राचार्य डी.एम. राऊत, परीक्षक डॉ. शिल्पा पारधी, मनोज रहांगडाले, पर्यवेक्षक सी.बी. पारधी, अनिल जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी मानकर यांनी, विद्यार्थ्यांनी फक्त विज्ञान शाखेकडेच न वळता व्यावसायीक शिक्षण सुद्धा घेण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण व्यवसाय, मार्गदर्शन कार्यालयाचे सहायक सचिव ए.झेड. फुलझेले यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता ओळखून पुढील जीवनाची दिशा निर्धारित करण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र तंत्रशिक्षण व तंत्र संचालनालय (मुंबई) यांच्यावतीने फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा २०१७ चे आयोजन करण्यात आले होते.या अपूर्व विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १८५ विज्ञानाचे प्रयोग (तांत्रिक), ४० गणिताचे मॉडेल्स व ६० कलाप्रदीतचे मॉडेल सादर केले. यातील १५ उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यात आली. परिक्षणाचे कार्य शिल्पा पारधी व मनोज रहांगडाले यांनी केले. संचालन पी.पी. बिसेन यांनी केले. मेळाव्यासाठी विज्ञान शिक्षक एस.डी. पुरी, सुनील मानकर, उके, अनिल कटरे, योगेश मेश्राम यांनी सहकार्य केले.