शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:52 IST

जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. त्याची चाचणी परीक्षेच्या माध्यमातून होते. पण शारीरिक व बौद्धिक चाचणी ही खेळाच्या व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून होत असते.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : सावली येथे स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. त्याची चाचणी परीक्षेच्या माध्यमातून होते. पण शारीरिक व बौद्धिक चाचणी ही खेळाच्या व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून होत असते. लहान लहान विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण अशा प्रकारच्या क्रीडा संमेलनातून बघायला मिळतात. आजचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे डिजिटल शाळेच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षण मिळणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.तालुक्यातील सावली येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ जिल्हा गोंदियाच्या वतीने मंगळवारी (दि.२९) आयोजित माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम यांच्या हस्त करण्यात आले.या वेळी सावलीचे सरपंच प्रभुदयाल पवार, उपसरपंच निलेश शेंडे, माजी सभापती वसंत पुराम, हितेश डोंगरे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण हुकरे, माजी जि.प.सदस्य राजेश चांदेवार, माजी पं.स. सदस्य रामेश्वर बहेकार, सामाजिक कार्यकर्ता केशव भुते, डॉ.अजय उमाटे, आदिवासी सहकारी संस्था पुराडाचे अध्यक्ष माणिकबापू आचले, लोजपाचे अध्यक्ष समीर कुरेशी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय मेहर, पोलीस पाटील चंद्रसेन रहांगडाले, माजी सरपंच चैतराम धुर्वे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग, गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते. कोरोटे म्हणाले, शिक्षक हे देशाचे चांगले नागरिक घडविण्याचे काम करतात त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये लोक पुढे जाऊन देशाच्या विकासात हातभार लावतात. काळाची गरज ओळख विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव यशवंत भगत यांनी मांडले. संचालन विषय शिक्षक दीपक कापसे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संदीप तिडके यांनी मानले.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा