शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेळापत्रकासाठी विद्यार्थ्यांची एसडीओ कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:02 IST

स्थानिक एस.एस.जे. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कला शाखेचे वेळापत्रक बदलून देण्यात यावे यासाठी उपविभागीय कार्यालयावर धडक देत निवेदन दिले.

अर्जुनी-मोरगाव : स्थानिक एस.एस.जे. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कला शाखेचे वेळापत्रक बदलून देण्यात यावे यासाठी उपविभागीय कार्यालयावर धडक देत निवेदन दिले. महाविद्यालय प्रशासन व विद्यार्थी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार अखेर वेळेत बदल करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखा आहेत. यापूर्वी कला शाखेचे वर्ग सकाळी ११ ते ३.४५ वाजतापर्यंत असायचे. यावर्षी विज्ञान व वाणिज्य शाखेच्या तासिका सकाळी तर कला शाखेची वेळ दुपारी १२ वाजतापासून करण्यात आली. दीड महिना महाविद्यालय सुरळीत चालले. शिवाय महाविद्यालयाने सत्र २०१६-१७ साठी काढलेल्या संस्थेच्या अपिल माहितीपत्रकात वेळेच्या बदलाची सूचना प्रकाशित केली नाही. गतवर्षीपेक्षा यंदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यात वाढ झाली, त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने वेळेत बदल केला. बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने विद्यार्थ्यांनी प्राचार्य व संचालक मंडळाकडे तक्रार केली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. शेवटी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला व सोमवारी दुपारी उपविभागीय कार्यालय गाठले. विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांना जावून भेटले व त्यांना निवेदन दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य, उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांच्यात चर्चा झाली. शेवटी महाविद्यालयीन वेळ ११ वाजता करण्याचे ठरले. यामुळे विद्यार्थ्यांचे समाधान झाले. (तालुका प्रतिनिधी)