शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार पूर्ण शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:54 IST

इयत्ता दहावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती,ओबीसी विद्यार्थ्यांना विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागातंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना दिलासा : शासनाचा निर्णय

ऑनलाईन लोकमतगोंदिया : इयत्ता दहावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती,ओबीसी विद्यार्थ्यांना विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागातंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र शिष्यवृत्तीच्या एकूण रक्कमेपैकी ४० टक्के रक्कम शैक्षणिक सत्र संपल्यानंतर देण्याचा निर्णय या विभागाने घेतला होता. परिणामी राज्यभरातील विद्यार्थी अडचणीत आले होते. विद्यार्थ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने हा निर्णय ७ मार्च रोजी रद्द करुन पूर्वीप्रमाणेच १०० टक्के शिष्यवृत्ती देण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाला दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये, यासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या मदतीने बरेच विद्यार्थी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व पदव्युत्तर शिक्षण घेतात. मात्र दोन महिन्यापूर्वी या विभागाने सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रातील पहिल्या सहामाहीसाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची ५० टक्के अशी एकूण १०० टक्के दिल्या जाणाºया रक्कमेपैकी ४० टक्के रक्कम शैक्षणिक सत्र संपल्यानंतर देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फटका लाखो शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना बसला. विविध महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अडचणी आले होते. महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच वसूल करते. त्याशिवाय विद्यार्थ्यांना क्लीअरन्स प्रमाणपत्र मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची पाळी आली होती. या निर्णयाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील इयत्ता दहावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाºया २५ हजार विद्यार्थ्यांना बसला होता. आधीच घरची परिस्थिती बेताची असल्याने हे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या मदतीने उच्च शिक्षण घेवून त्यांचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतात. मात्र विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाने घेतलेल्या अजब निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसमोर संकट निर्माण झाले होते. यावर विद्यार्थ्यांची ओरड वाढल्यानंतर आणि सर्वच बाजुने टिका झाल्यानंतर या विभागाने हा निर्णय ७ मार्च २०१८ रोजी मागे घेतला.केंद्र व राज्यपुरस्कृत विविध विविध शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीची संपूर्ण १०० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश दिले आहे.शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार आॅफलाईनविमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात शिष्यवृत्तीचीे रक्कम जमा केली जात होती. मात्र आॅनलाईन शिष्यवृत्तीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. तसेच काही ठिकाणी शिष्यवृत्तीमध्ये घोळ झाल्याचे प्रकार देखील घडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिष्यवृत्ती न देता ती पूर्वी प्रमाणेच आॅफलाईन पध्दतीने देण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे.विद्यार्थी संघटनाच्या लढ्याला यशशिष्यवृत्तीची पूर्ण रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात यावी. यासाठी जिल्ह्यातील विविध विद्यार्थी संघटनानी समाज कल्याण उपायुक्तांना निवेदन देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. अखेर या विभागाने आपला निर्णय मागे घेतल्याने त्यांच्या प्रयत्नाना यश आले आहे.