शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशिक्षणात विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल

By admin | Updated: June 15, 2015 00:49 IST

नागपूर येथील मिहान प्रकल्पाचे कार्य प्रगतीपथावर आहे.

आमगाव : नागपूर येथील मिहान प्रकल्पाचे कार्य प्रगतीपथावर आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर उपलब्ध झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेवून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन माजी आ. केशवराव मानकर यांनी केले. लक्ष्मणराव मानकर गुरूजी संकुलात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा शुक्रवार (दि.१२) पार पडले. या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उद्घाटन प्रफुल्ल वरखडे यांच्या हस्ते करण्यात आले. तंत्रशिक्षणात विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. मेळाव्यात त्या संबंधीचे स्टॉल्स लावण्यात असून माहिती पत्रकांतून संपूर्ण माहिती आपणास घेता येईल, असे ते म्हणाले. याप्रसंगी कार्यकारी प्राचार्य डॉ. डी.के. संघी, उद्योजक मनीष अग्रवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे शिवणकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य संदीप हनुवते यांनी केले. मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात गोंदिया शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे अधिव्याख्याता एस.डी. अंबादे यांनी प्रवेश प्रक्रिया व आॅनलाईन फॉर्म भरणे याबाबत मार्गदर्शन केले. एमकेसीएलतर्फे आदित्य कंप्यूटर आमगावचे मनोज लुलु व सूर्यवंशी यांनी एमएससीआयटी, क्लिक डिप्लोमा, विविध लँग्वेज अभ्यासक्रम, टॅली याबाबत मार्गदर्शन केले. संचालन प्रा. के.आर. चौधरी यांनी केले.मेळाव्याला परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. पंकज कटरे, नरेंद्र कावळे, विनायक अंजनकर, प्रा. ए.ए. सड्डल, जे.एम. गेडाम, राहुल संघी, प्रा. विजय राऊत, प्रशांत रावते, डिलेंद्र राणे, अमरिश रामटेके, राकेश दशरिया, रविशंकर राऊत, नीरज शहारे, सुनील शहारे, लक्ष्मी मते, कारूबाकी सामल, दिप्ती ठाकरे, उमेद पटले, एम.आर. तिवारी, देवेंद्र बोरकर, राकेश तिवले, दिनेश मस्के, भुमेश्वर ठाकरे, प्रशांत सोनवाने, नरेश कटरे आदींनी सहकार्य केले.