शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

मंजुरीनंतरही ३१ शाळांत विद्यार्थ्यांना प्रवेश नाही

By admin | Updated: October 23, 2016 01:43 IST

गोंदिया जिल्ह्यातील ३१ संस्थांना यावर्षी राज्य शासनाने स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्याची परवानगी दिली.

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ३१ संस्थांना यावर्षी राज्य शासनाने स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. शाळेचा दर्जावाढ करण्याचीही परवानगी देण्यात आली. ‘लोकमत’ने सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाने तीन वर्षानंतर हा निर्णय घेतला. परंतु त्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षण उपसंचालकांकडून मान्यता न मिळाल्याने तसेच शिक्षण विभागाची प्राथमिक मान्यताही न मिळाल्याने त्या शाळांना यावर्षी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहावे लागले.स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा यथास्थितीत, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना दर्जावाढ करणे, त्याकरीता अर्ज मागविणे, परवाणगी देणे, शैक्षणीक सत्र २०१३-१४ पासून मान्यता देण्यात आली. सीबीएसई, आयसीएसई, आयबी,आयजीसीएसई आणि सीआयई इत्यादी शिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमाशी संलग्नीत होण्यास इच्छुक असणाऱ्या इंग्रजी माध्यामांच्या शाळांना कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी देण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील ३१ शाळांना मान्यता देण्यात आली आहे. लोकमतच्या सतत पाठपुराव्यामुळे राज्यातील ४२३६ पैकी १०८५ शाळांना पात्र ठरविण्यात आले. यात गोंदिया जिल्ह्यातील ३१ शाळांचा समावेश आहे. यासंदर्भात २ जून २०१५ रोजी शासनाने हे जाहीर केले. शैक्षणीक सत्र २०१५-१६ या वर्षाकरीता मान्यता देण्यात आली. परंतु शिक्षण उपसंचालक नागपूर व शिक्षणाधिकारी यांच्या कडून परवानगी न मिळाल्याने या ३१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही. स्वयंअर्थसहाय्यित असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील आर.के.पब्लिक स्कूल मु.पो. नागरा ता.गोंदिया जि.गोंदिया, माँ शारदा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल ता. जि. गोंदिया, श्रीमती भागेरतीबाई आत्मारामजी डोंगरवार इंग्रजी प्राथमिक शाळा नवेगावबांध, ता. अर्जुनी-मोरगाव, आदिशक्ती पब्लिक इंग्लिश स्कूल काचेवानी ता.तिरोडा, प्रेसिडेंसी पब्लिक स्कूल बिरसी, पो.दासगाव ता.गोंदिया, मातोश्री सोनाबाई गोस्वामी इंग्लिश स्कूल तेढा ता. गोरेगाव जिल्हा गोंदिया, डॉ.राधाकृष्ण कान्व्हेंट कनेरी/केशोरी, ता. अर्जुनी-मोरगाव, लिटल फ्लावर्स अकादमी मलपुरी तिरोडा, युवराज तुरकर उच्च प्राथमिक स्कूल कासा पो.काटी, ता. गोंदिया, संस्कार ज्युनिअर कॉलेज कामठा ता.गोंदिया, जी.ई.एस. मनोहरभाई पटेल प्राथमिक शाळा गोंदिया एम.आई.ई.टी. परिसर कुडवा गोंदिया, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल चुलोद रोड (गोंदिया), प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कुल चुलोद रोड, चुलोद (गोंदिया), क्रेसेंट इंग्लिश कॉन्व्हेंट नंदननगर ता.तिरोडा, मुक्त जीवन शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सायन्स आसोली, ता. गोंदिया यांचा समावेश आहे. तसेच तिरोडा तालुक्यात विदर्भ पब्लिक स्कूल नवेझरी आदर्श भारत पब्लिक स्कूल हिवरा, ता.गोंदिया, आर.के.पब्लिक स्कुल नागरा, ता. गोंदिया, शहीद संजय पटले पब्लिक स्कुल तिरोडा, श्री छत्रपती शिवाजी राजे पब्लिक स्कूल गोंदिया, माऊंट कामेट पब्लिक स्कूल, ठाणा रोड, गोरेगाव, एपीजे फुतुरा स्कूल आमगाव खुर्द, हारीझोन इंग्लिश स्कूल मु.चुलोद,ता.गोंदिया, अभिनव विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रोंढा, ता.सालेकसा, पोद्दार इंटरनॅनशल स्कूल हिवरा, ता.गोंदिया, साकेत ज्युनिअर कॉलेज आॅफ कॉमर्स बजाज नगर, फुलचूर रोड, गोंदिया, गवराबाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय झालीया ता.सालेकसा, श्रीमती भागीरथीबाई आत्मारामजी डोंगरवार ज्यु.विज्ञान महाविद्यालय नवेगावबांध, ता.अर्जुनी-मोरगाव, छत्रपती विद्यालय सितेपार सितेपार, ता.आमगाव, एक्युट पब्लिक स्कूल कटंगीकला ता.गोंदिया, लिटील फ्लावर्स सायन्स व कॉमर्स ज्युनिअर कॉलेज मामा चौक विवेकानंद कॉलनी गोंदिया या ३१ शाळांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)