शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना धड जेवणही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 21:54 IST

वसतिगृहात राहून चांगले शिक्षण घेता यावे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी घरापासून दूर राहात आहेत.

ठळक मुद्देकंत्राटदाराचे मनमानी धोरण : अधिकाºयांचे अभय, तक्रारींची दखल नाही, विद्यार्थी दहशतीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वसतिगृहात राहून चांगले शिक्षण घेता यावे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी घरापासून दूर राहात आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना वसतिगृहात दोन वेळचे धड जेवणही मिळत नसल्याने अर्धपोटी झोपावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.गोंदियापासून २ कि.मी.अंतरावर असलेल्या मुर्री येथील अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा व वसतिगृह आहे. या वसतिगृहात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील १५० वर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण, नाश्ता, दूध दिले जाते. यासाठी सामाजिक न्याय विभागाने एका कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण मिळावे यासाठी शासनाकडून कंत्राटदाराला पैसे देखील मोजले जातात. मात्र मागील दोन तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. काही विद्यार्थ्यांनी याची तक्रार केल्यानंतर जेवणाच्या दर्जात सुधारणा करण्याऐवजी उलट विद्यार्थ्यांना दमदाटी करुन गप्प बसण्यास सांगत असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. सकाळचा नास्ता देखील निकृष्ट दर्जाचा असतो. विद्यार्थ्यांना दोन वेळेचे पोटभर जेवण देण्याची तरतूद आहे. मात्र विद्यार्थ्यांना मोजकेच जेवण दिले जात असल्याची माहिती आहे. एखाद्या विद्यार्थ्यांने पोळी किंवा वरणाची मागणी केल्यास त्याला ते देता दमदाटी करुन परत पाठविले जाते. त्यामुळे कित्येकदा आम्हाला उपाशीपोटी झोपावे लागत असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणाची तक्रार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेकदा गृहपाल आणि समाजकल्याण विभागाकडे केली. पण त्याची दखल घेतली नाही.विद्यार्थ्यांनाच दमदाटीवसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोन वेळेच जेवण देण्यासाठी कंत्राटदाराने स्वंयपाकी कर्मचाºयांची नेमणूक केली आहे. मात्र या कर्मचाºयांकडून विद्यार्थ्यांना नेहमीच दमदाटी केली जाते. जेवण आणि नास्ता देखील देण्यास टाळटाळ केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे.आतापर्यंत अनेकदा तक्रारवसतिगृहातील विद्यार्थ्यांना कंत्राटदाराकडून दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जा योग्य नाही. कर्मचाºयांकडून दमदाटी केली जात असल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी किमान सहा ते सात वेळा गृहपाल आणि समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे केली. मात्र त्यांच्या तक्रारीची अद्यापही दखल घेण्यात आली नाहीसमाज कल्याण विभागाचे दुर्लक्षवसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणासंबंधी असलेल्या तक्रारी गृहपालाने लेखीपत्र देऊन समाज कल्याण विभागाच्या अधिकाºयांना वांरवार कळविल्या. मात्र अधिकाºयांनी याची अद्यापही दखल घेतलेली. त्यामुळे या विभागाचे अधिकारी कंत्राटदाराला अभय देत असल्याचा आरोप आहे.