शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 21:53 IST

आजच्या विज्ञान युगात स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व आहे. आज स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करुन मोठमोठ्या पदावर नवीन पिढी जात आहे.

ठळक मुद्देसतिश मंत्री : बक्षीस वितरण समारंभ

आॅनलाईन लोकमततिरोडा : आजच्या विज्ञान युगात स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व आहे. आज स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करुन मोठमोठ्या पदावर नवीन पिढी जात आहे. बालवयातच लोकमत संस्काराचे मोतीमुळे स्पर्धा परीक्षेची जाणीव, विविध माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा प्राप्त झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या जगाची माहिती मिळून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत प्राचार्य सतिश मंत्री यांंनी व्यक्त केले.शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ‘लोकमत संस्काराचे मोती’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते.या वेळी प्राचार्य मंत्री, लोकमतचे तालुका प्रतिनिधी डी.आर. गिरीपुंजे यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. या वेळी शाखा समितीचे सदस्य दीपक जायस्वाल, शिक्षिका छाया मडावी, पामराज टेंभरे प्रामुख्याने उपस्थित होते.या वेळी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या अनुक्रमे हर्षल उदेलाल बोपचे, रिया अनिल बावनकर, डिलेश्वरी ग्यानीराम ब्राम्हणकर यांना रिमोट कंट्रोल कार, लंच बॉक्स तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना (७४) टिफीन बॉक्स देण्यात आले.या वेळी पर्यवेक्षक ए.जी. नागपुरे यांनी, विद्यार्थ्यांनी लोकमतमधील संस्काराच्या मोती या पानावरील माहितीचे संकलन करावे, या माहितीचा भविष्यात उपयोग होईल. सामान्य ज्ञानात वाढ होवून पुढे स्पर्धा परीक्षांसाठी ते ज्ञान उपयोगी ठरेल, असे सांगितले.तर तालुका प्रतिनिधी गिरीपुंजे यांनी, आत्मविश्वास कसा निर्माण करावा, त्यासाठी काय करावे व त्यात कसे सातत्य असावे, असे सांगून परीक्षांना सामोरे जाण्यासाठी कशी तयारी करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.संचालन व आभार लोकेश चौरावार यांनी केले. कार्यक्रमासाठी पुष्पा चवळे, साधना व्यास, पी.एम. हरिणखेडे, संध्या खंडाते, दिलीप झरारीया, आर.जे. ठाकूर, रंजना वाहणे, ओमेश्वरी चौधरी, धर्मराज बिसेन यांनी सहकार्य केले.