शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

विद्यार्थ्यांनो, संकल्पाने कर्तृत्ववान व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:51 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कर्तुत्वाने महामानव झाले. महात्मा फुलेंनी आपल्या कर्तुत्वाने ज्या ठिकाणी शिक्षणाचा दिवा नव्हता तेथे शिक्षणात प्रगती केली.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : संजय गांधी महाविद्यालयाचे वार्षिक स्रेहसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा (तेढा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कर्तुत्वाने महामानव झाले. महात्मा फुलेंनी आपल्या कर्तुत्वाने ज्या ठिकाणी शिक्षणाचा दिवा नव्हता तेथे शिक्षणात प्रगती केली. तसेच विद्यार्थ्यांनीसुद्धा कर्तृत्ववान होऊन, शिक्षणाचा खरा अर्थ समजून, आपल्या आई-वडील व देशासाठी काही करण्याचा संकल्प केला तर त्यांना नक्कीच पुढे चांगली वाट मिळेल, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.तेढा येथील संजय गांधी महाविद्यालय व मातोश्री सोनाबाई गोस्वामी इंग्रजी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये चार दिवसीय वार्षिक स्रेहसंमेलन तसेच कला व विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून ते मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले, आताचे जग अत्यंत वेगाने पुढे चालले आहे. विज्ञानाची मोठी प्रगती होत आहे. वैज्ञानिक दुसºया ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. स्टीफन हॉकीन्सच्या शोधानुसार आपल्या आकाशात अनेक जीवसृष्ट्या असल्याचे अनुमान आहे. जग आता खुप लहान झालेला आहे. आपल्या हातात असलेल्या मोबाईलवर सर्वकाही दिसत आहे. हिरा खानीतून निघाला तर दगडासारखाच असतो, पण त्याच्यावर पैलू पारखनारा जो कामगार असतो तो त्या हिºयाला चकाकी देतो. विद्यार्थी सुद्धा कच्चा हिºयासारखेच आहेत. त्यांना चकाकी देण्याच्या कामाची जबाबदारी शिक्षक-पालक व समाजातील प्रतिष्ठांची आहे, असे त्यांनी सांगितले.अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. अतिथी म्हणून सभापती दिलीप चौधरी, तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, भाऊसाहेब गोस्वामी, जि.प. सदस्य ज्योती वालदे, माजी समाजकल्याण सभापती कुसन घासले, माजी जि.प. सदस्य खुमेंद्र मेंढे, सरपंच रत्नकला भेंडारकर, सुशांत गोस्वामी, विभा गोस्वामी, सावलराम ताराम, काशिनाथ भेंडारकर, रमेश पटले, मनोज वालदे, प्रा.पी.एल. पंचभाई, पर्यवेक्षक बी.एन. बन्सोड, वनमाला गोस्वामी उपस्थित होते.प्रास्ताविकातून भाऊसाहेब गोस्वामी यांनी, शाळेतील प्रगती व भविष्यातील वाटचाल तसेच शाळेला कोणत्या गरजा आहेत व शाळेला कशाप्रकारे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून आयएसओ २०१५ प्रमाणपत्र मिळाले, यावर मत व्यक्त केले.या वेळी वर्ग १० वी व १२ वीच्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व संस्था सचिव भाऊसाहेब गोस्वामी यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ, मोमेंटो व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी समूहगीत, एकांकी, नाटक, कोळी गीत, आदिवासी गीत, रेकार्डिंग डान्स आदींचे सादरीकरण केले.संचालन प्रा.पी.झेड. कटरे यांनी केले. आभार प्रा.डी.एम. तितरमारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी क्रीडा प्रमुख एस.आर. मुंगमोडे, सांस्कृतिक प्रमुख ओ.आय. रहांगडाले, कोषाध्यक्ष एन.जे. साखरे, जी.टी. राऊत, सी.सी. शेंडे, जी.एम. बघजेले, ए.बी. करंजेकर, एन.सी. रहांगडाले, पी.जी. कटरे, एनसीसी व स्काऊटचे विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.मान्यवरांची मतेया वेळी हेमंत पटले यांनी, सांस्कृतिक कार्यक्रमातून अनेक कलावंत तयार होतात. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांत वाढ होते व आत्मविश्वास निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा प्रखर साहस व जिद्द विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा, असे आवाहन केले. दिलीप चौधरी यांंनी सांस्कृतिक कार्यक्रम हा शाळेचा आत्मा आहे. यातूनच विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांत वाढ होते. प्रत्येक विद्यार्थ्यांे यात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. लक्ष्मण भगत यांनी अनेक थोरपुरुषांनी केलेल्या समाजकार्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्यासारखीच जिद्द निर्माण करुन अभ्यास करावा, असे सांगितले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले