शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डीबीटी विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:19 IST

शासकीय वसतिगृह असलेली खाणावळ बंद करुन डीबीटी योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात जेवणाची थेट रक्कम जमा करण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासनाच्या आदिवासी विभागाने ५ एप्रिल रोजी घेतला.

ठळक मुद्देआदिवासी विद्यार्थी रस्त्यावर : वसतिगृहातच जेवण देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : शासकीय वसतिगृह असलेली खाणावळ बंद करुन डीबीटी योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात जेवणाची थेट रक्कम जमा करण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासनाच्या आदिवासी विभागाने ५ एप्रिल रोजी घेतला. हा डीबीटी निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांकरीता अन्यायकारक असून तो त्वरीत रद्द करुन पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्याना वसतिगृहात जेवण देण्यात यावे. या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाने गुरुवारी (दि.१९) रखरखत्या उन्हात मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.डीबीटी योजना कायमस्वरुपी बंद करुन पूर्ववत करण्यात यावी, वस्तीगृहाची खाणावळ नियमित पूर्ववत चालू ठेवण्यात यावी, डिबीटी संदर्भातील ५ एप्रिल २०१८ चा निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुरक्षा अधिनियम बनविण्यात यावे जेणेकरुन कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही, अल्पसंख्याक मुस्लीम विद्यार्थी सुद्धा राज्याचा अभिन्न घटक असून त्या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत व स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) त्वरीत सुरु करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांची क्रिमीलेअरची अट रद्द करुन सरसकट इतर जाती-जमाती प्रमाणे त्यांनाही शिष्यवृत्ती बहाल करण्यात यावी आदि मागण्यांना घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.राणी दुर्गावती चौकात राणी दुर्गावतीच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. ‘डीबीटी हटाओ-होस्टेल बचाओचा’ नारा देत मोर्चा चिचगड मार्गाने प्रकल्प कार्यालयावर धडकला. तोंडावर काळी पट्टी बांधून शासनाच्या डीबीटी निर्णयाचा विरोध करीत विद्यार्थ्यांनी जोरदार नारेबाजी करीत मोर्चा काढला. दरम्यान प्रकल्प कार्यालयात जावून सहायक प्रकल्प अधिकारी भोंगाडे यांना मुख्यमंत्री व राज्यपाला यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. मोर्चात आदिवासी विद्यार्थी संघाचे आदेश उईके, प्रियंका बवर, लीलाधर कोरेटी, नरेश नेताम, योगराज सासुरवार, वंदना नेताम, रेखा मडावी, मानकुवर सेवंता, उषा घरत, चेतन उईके, शालु पंधरे, सुनिता गावळकर, अर्चना ताराम व्यतिरीक्त शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.