शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, शिक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:07 IST

भारतीय संस्कृतीत गुरु व शिष्याचे नाते हे पवित्र असते. शाळा हे एक पवित्र मंदिर आहे. ज्या पवित्र मंदिरातून आदर्श पिढी घडविण्याचे कार्य केले जाते.

ठळक मुद्देपालकांची पोलिसांत तक्रार : बुधेवाडा येथील घटना

आॅनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : भारतीय संस्कृतीत गुरु व शिष्याचे नाते हे पवित्र असते. शाळा हे एक पवित्र मंदिर आहे. ज्या पवित्र मंदिरातून आदर्श पिढी घडविण्याचे कार्य केले जाते. त्याच मंदिरात चिमुकल्या विद्यार्थिनींचा लैगिंक छळ केला जातो. ही घटना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधेवाडा येथे मंगळवारी (दि.५) उघडकीस आली.या घृणास्पद प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या शिक्षकावर अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून मंगळवारी रात्री त्याला अटक केली आहे. त्या आरोपी शिक्षकाचे नाव गोपाल निलकंठ जनबंधू (४८) आहे. तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधेवाडा येथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहे. तो शाळेत कर्तव्यावर असताना लघूशंका व मध्यान्ह सुटीत सहकारी शिक्षक नसल्याची खात्री करुन कधी एक, कधी दोन तर कधी तीन विद्यार्थिनीना बोलवायचा. वर्ग खोलीच्या खिडक्या व दरवाजा बंद करुन विद्यार्थिनींच्या गुदगुद्या व अनेक अश्लील चाळे करीत असे. हा प्रकार मागील महिन्याभरापासून सुरु होता. पिडित विद्यार्र्थिनी या तिसºया व चौथ्या वर्गातील आहेत. शिक्षकाकडून होत असलेल्या लैगिंक अत्याचाराची माहिती विद्यार्थिनींच्या पालकांना कळली. त्यांनी मंगळवारी याची अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक संदीप वाटोळे व देवरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळ यांनी बुधेवाडा येथे भेट दिली. आरोपी शिक्षकाविरुद्ध कलम ३७६ (२), (फ), (आय), (जे), ३५४ (अ) (१) (एक) भादंवि, सहकलम ३ (ब), ४, ७, ८, ९ (म), १० लैगिंक अपघरात बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलसिंह सूर्यवंशी तपास करीत आहेत.शिक्षकावर निलंबनाची कारवाईविद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्याची घटना उघडकीस आल्यानंतर जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी तातडीने शिक्षक गोपाल जनबंधू यांच्यावर आज (दि.६) निलंबनाची कारवाई केली.