शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर अपघातात विद्यार्थी ठार, दोघे जखमी

By admin | Updated: March 8, 2015 01:10 IST

बाक्टी-चान्ना येथील गाव तलावाजवळ झालेल्या ट्रॅक्टर अपघातामध्ये एक शाळकरी विद्यार्थी मृत्युमुखी पडला, तर दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

बोंडगावदेवी : बाक्टी-चान्ना येथील गाव तलावाजवळ झालेल्या ट्रॅक्टर अपघातामध्ये एक शाळकरी विद्यार्थी मृत्युमुखी पडला, तर दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि.७) सकाळी ९.३० वाजतादरम्यान घडला.मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दहावीचे पेपर सुरू असल्याने विद्यार्थ्यांची सकाळ पाळीमध्ये शाळा असते. चान्ना बाक्टी येथील मिलिंंद विद्यालयात येरंडी/देवी येथील विक्रम शिवचरण बहेकार (१३) हा इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. सकाळपाळीची शाळा करुन तो ९.३० वाजता गावाला जाण्यासाठी सायकलीने चान्नामार्गे निघाला होता. घटनास्थळी पिंपळगाव/खांबी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे दोन विद्यार्थी पुलावर बसले होते. त्याचक्षणी चान्ना येथील सोनवाने ठेकेदाराचा भरतीचा ट्रॅक्टर वेगाने आला. त्यात विक्रम बहेकार हा विद्यार्थी ट्रालीच्या मागच्या चाकात दबून गेला. येरंडी-देऊळगाव येथील लोकेश कोवे (१५), टायसन रंगारी (१६) या दोघांना सुद्धा मार लागला. गावकऱ्यांनी लगेच तिघांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. गंभीर अवस्थेत असलेल्या विक्रमला प्राथमिक उपचार करून रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने खासगी गाडीने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोन विद्यार्थ्यांवर चान्ना पीएचसीमध्ये डॉ.शिरसाट यांनी औषधोपचार करुन सुटी दिली. चान्ना येथील एका सोनवाने नामक ठेकेदाराचा ट्रॅक्टर एम.एच. ३५ जी ४२७२, ट्रॉली एमएच ३५ एफ १९५० होता. त्यात भागवत लोगडे, सदाशिव पुराम, देवचंद लोगडे हे मजूर ट्रॅक्टरमध्ये बसले होते. घटनेची माहिती मिळताच अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि राजेश गज्जल, महेंद्र पुण्यप्रेडीवार, इंद्रपाल कोडापे, दिवाकर शहारे व अन्य पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास ठाणेदार अभिषेक पाटील, सपोनि राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इंद्रपाल कोडापे करीत आहेत. (वार्ताहर)