शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १४ तास बिबट्याचा घरात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:56 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील एका गावकºयाच्या घरात बिबट्याने तब्बल चौदा तास ठिय्या मांडला होता. दरम्यान वन आणि वन्यजीव विभागाच्या कर्मचाºयांच्या मदतीने घरात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात यश आले.

ठळक मुद्देबिबट्याला बेशुद्ध करुन बाहेर काढले : गावकऱ्यांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील एका गावकºयाच्या घरात बिबट्याने तब्बल चौदा तास ठिय्या मांडला होता. दरम्यान वन आणि वन्यजीव विभागाच्या कर्मचाºयांच्या मदतीने घरात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात यश आले. यानंतर गावकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना शनिवारी (दि.१५) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार येरंडी येथील शालीकराम दोनोडे यांच्या घरातील सर्व मंडळी रात्री जेवण करुन झोपले होते. रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान अचानक एका बिबट्याने त्यांच्या घरातच प्रवेश केला. घरात बिबट आल्याची चाहुल लागताच घरातील सर्व लोक जागी झाले. त्यांनी घराशेजारच्यांचा आसरा घेतला. इकडे बिबट्याने घराच्या धाब्यावर आपले बस्तान मांडले.घरात बिबट्या शिरल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. रात्रीच वनविभागाचे कर्मचारी गावात दाखल झाले. त्यांनी वेळीच उपाययोजना सुरू केली. रात्रभर बिबट्यानी धाब्यावर दबा धरुन आपला मुक्काम ठोकला. रविवारी (दि.१६) दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच येरंडी गावाला जत्रेचे स्वरुप आले.वरिष्ठांना माहिती कळताच उपवनसंरक्षक नरेंद्र शेंडे, परिविक्षाधिन सहायक वनसंरक्षक नवा किशोर रेड्डी, वनपरिक्षेत्राधिकारी छगनलाल रहांगडाले, ए.एम. खान, नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर खोडसकर, अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचा ताफा येरंडी गावात पोहचला. रविवारी सकाळी १० वाजतापासून बिबट्याला घराबाहेर काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. धाब्यावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डॉ. खोडसकर यांनी इंजेक्शन बंदुकीत भरले. मिथून चव्हाण यांनी घरावरील कवेलू काढून बिबट्याला सकाळी ११ वाजताच्या सुमारास पहिले इंजेक्शन दिले. वेळेच्या आत त्याला गुंगी आलीच नाही. नंतर १२.०४ वाजता अमोल चौबे यांनी दुसरे इंजेक्शन लावले. त्याला गुंगी आली तो बेशुद्ध पडला. दुपारी १२.१५ वाजता त्याला धाब्यावरुन बेशुद्धावस्थेत घराबाहेर काढण्यात आले. १२.२० वाजता वनविभागाच्या गाडीने बिबट्याला नवेगावबांधला हलविले. तब्बल १४ तास बिबट्याने घरात वास्तव्य करुन गावकऱ्यांची झोप उडविली होती. गावात कोणतीही हानी न होता बिबट्याला यशस्वीपणे जेरबंद करण्याची कामगिरी वन विभागाने केली. बिबट्या ३ वर्षाचा असून ३० किलो त्याचा वजनाचा होता. बिबट्या जेरबंद झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

टॅग्स :leopardबिबट्या