शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन : कनिष्ठ अभियंता बिसेन व अन्य अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:57 IST

मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिक संकटात आली आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र यानंतरही पाटबंधारे विभाग जलाशयाचे पाणी सोडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

ठळक मुद्देसंग्रामपूर जलाशयाचे पाणी सोडा

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिक संकटात आली आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र यानंतरही पाटबंधारे विभाग जलाशयाचे पाणी सोडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. तालुक्यातील संग्रामपूर जलाशयाचे पाणी पिकांसाठी सोडण्यात यावे. या मागणीला घेवून जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती यांच्या नेतृत्त्वात येथील पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.संग्रामपूर जलाशयाचे पाणी यापूर्वी सोडण्यात आले होते. मात्र मध्येच पाणी बंद केल्याने सर्वच शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे धानपिक संकटात आले आहे. याची माहिती पाटबंधारे विभागाला देण्यात आली. विशेष म्हणजे, यावर्षी संग्रामपूर जलाशय शंभर टक्के भरले होते. त्यामुळे खरीपासह रब्बीला देखील पाणी मिळेल अशी आशा शेतकऱ्यांत निर्माण झाली होती. मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे कालव्यातील पाणी वाहून गेले.त्यामुळे खरीपासह रब्बीचा हंगाम सुद्धा संकटात आला आल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. पिकांना पाण्याची गरज असून पावसाअभावी धानपिक वाळत असल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट अधिक गडद होत आहे. त्यामुळे पिकांची स्थिती लक्षात घेता जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र विभागाकडून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून कनिष्ठ अभियंता बिसेन व संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली.