शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST

कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या अधिपरिचारीकांना राहण्याची व जेवणाची सोय करावी, कोविड पॉजिटीव्ह आलेल्या अधिपरिचारीकांना होम क्वारंटाईन (क्वार्टर) व सोबत जेवणाची सोय करून द्यावी, डॉक्टरांचे काम डॉक्टरांनी करावे, कोविडच्या कामात परिचारीकांची संख्या कमी असल्याने संख्या वाढविण्यात यावी, संगणक ऑपरेटरचे काम त्यांना सांगण्यात यावे ते काम परिचारीकांवर सोपवू नये, अपुऱ्या साधनांमुळे रूग्णांचा उपचार होऊ शकत नाही.

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा : अपुऱ्या सुविधांमुळेही आरोग्यावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कुेगोंदिया : अतिरीक्त कामाचा ताण व त्यात अपुऱ्या सोयीसुविधांमुळे परिचारिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून अन्य महत्वाच्या मागण्यांना घेऊन येथील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत परिचारिकांनी मंगळवारी (दि.१५) कामबंद आंदोलन केले.कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या अधिपरिचारीकांना राहण्याची व जेवणाची सोय करावी, कोविड पॉजिटीव्ह आलेल्या अधिपरिचारीकांना होम क्वारंटाईन (क्वार्टर) व सोबत जेवणाची सोय करून द्यावी, डॉक्टरांचे काम डॉक्टरांनी करावे, कोविडच्या कामात परिचारीकांची संख्या कमी असल्याने संख्या वाढविण्यात यावी, संगणक ऑपरेटरचे काम त्यांना सांगण्यात यावे ते काम परिचारीकांवर सोपवू नये, अपुऱ्या साधनांमुळे रूग्णांचा उपचार होऊ शकत नाही. त्यामुळे रूग्णांचे नातेवाईक मारण्यास धावतात त्यांच्यापासून सुरक्षिततेचा प्रश्न उदभवतो अशात सुरक्षा मिळावी अशी परिचारिकांची मागणी आहे.विशेष म्हणजे, वैद्यकीय अधिष्ठाता पीपीई कीट घालून रूग्ण सेवा करायची नाही असे म्हणतात. अशात कोविडमध्ये काम करणाºया परिचारीकांना डॉक्टरांचा त्रास होत असल्यामुळे परिचारीकांनी मंगळवारी (दि.१५) कामबंद आंदोलन केले. यासंदर्भात आमदार विनोद अग्रवाल यांनी वैद्यकीय महाविद्यालय गाठून अधिष्ठाता डॉ. विनायक रूखमोडे यांच्याशी चर्चा केली आहे.पारिचारीका वाढविल्या शिवाय कामावर येणार नाहीमहाविद्यालयात परिचारिकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत परिचारिकांवर कामाचा ताण येत आहे. शिवाय अपुºया सुविधांमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. करिता परिचारिकांची पदे भरून त्यांची संख्या वाढविली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा परिचारिकांचा पवित्रा आहे.

टॅग्स :StrikeसंपMedicalवैद्यकीय