शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसा येथे कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

सालेकसामध्ये व्यापारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. ही शहरासाठी मोठी चिंतेची बाब आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास ५ हजार लोक बाधित झाले आहेत. सालेकसा तालुक्यात १६० कोरोना बाधित आढळले आहेत. ३ लोकांचा मृत्यू ही झाला आहे.

ठळक मुद्देजनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद : मेडिकल व बँक सुरु असून ही शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा शहरातील नागरिकांनी व्यापारी संघाच्या सहकार्याने ६ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. ६ दिवसीय जनता कर्फ्यूच्या बुधवारी (दि.२३) पहिल्या दिवशी सालेकसा येथे कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला आहे. त्यात सालेकसा शहरासह संपूर्ण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान सालेकसामध्ये व्यापारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. ही शहरासाठी मोठी चिंतेची बाब आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास ५ हजार लोक बाधित झाले आहेत. सालेकसा तालुक्यात १६० कोरोना बाधित आढळले आहेत. ३ लोकांचा मृत्यू ही झाला आहे. मृत्यू झालेल्यापैकी एक माजी सरपंच तर दुसरा विद्यमान उपसरपंच आणि तिसरा इंजिनियर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेले तिन्ही कोरोना बाधित ३० ते ५० मधातील वयोगटातील आहेत. सुरुवातीला तालुक्यातील ग्रामीण भागातच कोरोनाचा शिरकाव झाला होता. परंतु आता सालेकसा शहरात १० ते १५ कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गावकरी चिंतेत आहे. किमान ६ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला.यावेळी जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशाचे पालन करीत शहरातील बाजारपेठेतील आणि सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली. २३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंतच्या जनता कर्फ्यू कठोरतेने पाळून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.बँकेतील गर्दी झाली कमी६ दिवसीय जनता कर्फ्यूमध्ये बँका, मेडिकल स्टोअर्स, सरकारी व खासगी दवाखाने सुरु ठेवण्याची सुट देण्यात आली. मात्र यावेळी बँकांमध्ये बाहेरुन येणाऱ्या ग्राहकांची गर्दी कमी झाली होती. कर्मचाऱ्यांनी आतूनच कामकाज चालविला तसेच कामाच्या वेळा सुद्धा कमी करण्यात आल्या आहे.दारु दुकानांना सुद्धा पूर्ण ६ दिवस बंद पाडण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्यांना ३ दिवसांपेक्षा जास्त बंद ठेवता येत नव्हते. त्यामुळे उर्वरित ३ दिवस दुपारच्या वेळेत फक्त काही वेळेसाठी दारु दुकाने सुरु ठेवण्याची सुट देण्यात आली आहे. ते ही फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्याच्या अटीवर.-राजेन्द्र बागळे, पोलीस पाटील, आमगाव खुर्द.पोलीस स्टेशनच्यावतीने सालेकसा येथील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून दिवसभर येण्या-जाणाºयांवर नजर ठेवत मास्क घालण्यासाठी सक्ती केली जात आहे. तसेच जनता कर्फ्यूचे शांततेत पालन करावे यासाठी प्रयत्न करुन सहकार्य केले जात आहे.-राजकुमार डुणगे, ठाणेदार सालेकसा.