शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना तणावमुक्तीचा कानमंत्र

By admin | Updated: May 15, 2017 00:17 IST

जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापन विषयावरील कार्यशाळा उपमुख्यालय देवरी,

ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा : पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येत हजेरी लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापन विषयावरील कार्यशाळा उपमुख्यालय देवरी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृह तसेच पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात घेण्यात आली. कार्यशाळेत यशदा पुणेचे मानद व्याख्याते अशोक देशमुख यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तणावातून मुक्त कसे राहता येईल, याचा कानमंत्र दिला. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून यशदा पुणेचे मानद व्याख्याते अशोक देशमुख उपस्थित होते. पोलीस अधिकारी, कर्मचारी कर्तव्य बजावित असताना शिस्त, गस्त व बंदोबस्त यात नेहमीच मग्न राहतात. यावेळी येणारा ताण, वेळी व अवेळी खाणे, अपूरी झोप त्यामुळे त्यांना मधूमेह, उच्च रक्तदाब अशा प्रकारचे आजार जडतात. मानसिक आजारपण आणि मानसिक ताणतणाव यामुळे आयुष्यातील आनंद हिरावून जातो. असे सांगत देशमुख यांनी आरोग्य निरोगी रहावे याकरिता दररोज सकाळी उठून ४० मिनिटे पायी चालावे, नियमित व्यायाम, वेळेवर जेवण व झोप घ्यावी, बालपण, संस्कार, विचार, भावना, कृती यात तारतम्य असावे, योग्य वेळी, योग्य ठिकाणी बोलल्यास अडचण येत नाही. दिवसभर काम केल्याचे समाधान मिळाले पाहिजे. त्यामुळे सुखाची झोप लागून मानसिक आरोग्य चांगले राहील, असे सांगितले. कार्यशाळेत उपमुख्यालय देवरी येथे १७५ पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधीक्षक कार्यालय येथील मंथन सभागृहात ९० ते १०० पोलीस अधिकारी, कर्मचारी व मंत्रालयीन कर्मचारी तसेच प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय कारंजा येथे २८० ते ३०० पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. कार्यशाळेच्यासाठी पोलीस उपअधीक्षक (गृह) मनोहर दाभाडे, सुनील बांडेकर, किशोर चौरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.