शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

सुदृढ आरोग्यासाठी मन बळकट हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 22:13 IST

अभ्यासक्रम व शालेय जीवनातील विविध समस्या यामुळे आज तरुण पिढीमध्ये नैराश्य येवून आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. सुदृढ आरोग्यासाठी मनाने बळकट व्हायला पाहिजे, असे समुपदेशन केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित वालदे यांनी केले.

ठळक मुद्देअमित वालदे : विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यावर समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : अभ्यासक्रम व शालेय जीवनातील विविध समस्या यामुळे आज तरुण पिढीमध्ये नैराश्य येवून आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. सुदृढ आरोग्यासाठी मनाने बळकट व्हायला पाहिजे, असे समुपदेशन केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित वालदे यांनी केले.जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत गोंदिया येथील के. टी. एस. रुग्णालयाच्यावतीने शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम सरस्वती विद्यालयात इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य, समस्या व उपाय यावर समुपदेशन करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका वीणा नानोटी होत्या. या वेळी प्रामुख्याने के. टी. एस. रुग्णालयातील मानसिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. मीना रेवतकर उपस्थित होत्या.डॉ. वालदे पुढे म्हणाले, मित्रांचा सहवास, वाईट सवयी, मित्रांचे दडपण, रॅगिंग इत्यादीमुळे ताणतणाव वाढते. कुमारवयात लैगिंक गोष्टींचे आकर्षण वाढत जाते. त्यामुळे भावभावना वाढतात. अशावेळी आपली वागणूक चांगली ठेवा. याच वयात लैगिंक भावनांमुळे आपले पाऊल चुकीच्या दिशेकडे वळते. परिणामी फार गंभीर समस्या निर्माण होतात. मोबाईलचा चांगल्या कामासाठी उपयोग करा. आज मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम घडत आहे. विद्यार्थी जीवनात मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनता वाढली आहे. मोबाईल, धुम्रपान, मद्यप्राशन, टी.वी., व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या अतिवापरामुळे ताणतणाव वाढला आहे. यावर नियंत्रण ठेवावे, असे त्यांनी सांगितले.तर डॉ. रेवतकर यांनी, आज मुलांना आई-वडिलांची घातलेली बंधने जाचक वाटतात. या वयात विद्यार्थ्यांच्या मनाचा पुरेसा विकास झालेला नसतो. आपल्यावर परकीय संस्कृतीचा परिणाम झाला आहे. व्यक्तिगत व्यक्तिमत्व काय, हे ओळखता यायला हवे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाला ५५० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. संचालन छाया घाटे यांनी केले. कार्यक्रमासाठी माधुरी पिलारे, शिवचरण रार्घोते, संजयकुमार बंगळे, के.के. लोथे, प्रा. तारका रुखमोडे, सुरेश बर्गे आदिंनी सहकार्य केले.