शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल थकीत झाल्याने पथदिव्यांची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

केशोरी : महावितरण कंपनीचे अकरा लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे येथील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने मागील दोन ...

केशोरी : महावितरण कंपनीचे अकरा लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे येथील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने मागील दोन दिवसांपासून गावात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पथदिव्यांच्या विजेचे बिल भरण्याकरिता जिल्हा परिषद ग्रामपंचायतीकडे बोट दाखवीत असल्याने केशोरी ग्रामपंचायत अडचणीत आली आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम केशोरी येथील ग्रामपंचायत या परिसरामधून मोठी ग्रामपंचायत आहे. विकासाची कामे करण्यात ती अग्रेसर असते; परंतु कोरोना विषाणूच्या महामारीने ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. विकासाच्या कामांना ब्रेक लागला आहे. अशातच विद्युत वितरण कंपनीने ग्रामपंचायतीला अकरा लाख रुपयांचे थकीत पथदिव्यांचे बिल भरणा करण्यासंबंधी नोटीस बजावून पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावातील नागरिकांना प्रकाश देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असली तरी पथदिव्यांच्या वीज बिलाची रक्कम भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. पथदिव्यांच्या बिलासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून जिल्हा परिषदेकडे वर्ग करीत असे. सदर प्राप्त झालेल्या निधीतून जिल्हा परिषद पथदिव्यांच्या बिलाचा भरणा करण्याची प्रचलित पद्धत सुरू होती; परंतु आता सदर पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणा करण्यासाठी जिल्हा परिषदेने हात झटकल्यामुळे बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आली आहे.

...........

शासनाच्या मंजुरीअभावी अडचण

गेल्या वर्षीपासून आलेल्या कोरोना संकटामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे विजेचे बिल भरणे शक्य नाही. थकीत विद्युत बिलाची रक्कम अकरा लाख थकीत असल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूच्या महामारीने गावातील विकासकामे प्रभावित झाली आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या निधीतून पथदिव्यांच्या विजेचा बिल भरणा करावा, असे सांगून जिल्हा परिषदेने आपले हात झटकले आहेत; परंतु या निधीचा विनियोग करण्यासाठी एक वर्षापासून नियोजन करून शासनाच्या मंजुरीकरिता पाठविण्यात आले आहे. त्या मंजुरी प्रस्तावात पथदिव्याच्या विद्युत बिलाचा समावेश नाही.

...........

महावितरण कंपनीने केशोरी गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला असून, कोरोना संकटामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. ग्रामपंचायतीला एवढ्या थकीत रकमेचे विद्युत बिल भरणे शक्य नाही. पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेने या विद्युत बिलाचा भरणा करण्याची गरज आहे.

-नंदू पाटील गहाणे, सरपंच, केशोरी