शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:14 IST

महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमीक महासंघाच्यावतीने १० सप्टेंबर पासून बेमुदत शाळाबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गोंदिया जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालय देखील सहभागी झाली आहेत.

ठळक मुद्देराज्यस्तरीय आंदोलन : १० सप्टेंबरपासून झाली सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमीक महासंघाच्यावतीने १० सप्टेंबर पासून बेमुदत शाळाबंद आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला गोंदिया जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालय देखील सहभागी झाली आहेत. संपुर्ण राज्यात १३०० विना अनुदानीत उच्च महाविद्यालय आहेत. त्यात २२ हजार ५०० शिक्षक गेल्या १५ ते १८ वर्षांपासून सेवा देत आहेत.यापैकी आतापर्यंत अनेक शिक्षक रु पयांचे सुद्धा वेतन न घेता सेवानिवृत्त झाले आहेत. अनेक शिक्षकांना असाध्य आजारांनी जकडले आहे. वेतन नसल्याने नोकरी असूनही लग्न झालेले नाही. राज्य शासनाकडे अशा विनाअनुदानीत उच्च माध्यमीक विद्यालयांचे १२०० अनुदान पात्र प्रस्ताव आहेत.त्यापैकी १२३ महाविद्यालय आणि २३ अतिरीक्त तुकड्यांना १८ फेब्रुवारी रोजी शासनाने अनुदान घोषीत केले. त्यांना २० टक्के वेतनाची घोषणा शासनाने ५ सप्टेंबर रोजी केली. उर्वरीत ११५० महाविद्यालय आणि हजारो शिक्षकांवर अन्याय झाला आहे. विनाअनुदानीत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत वेतनाच्या मागणीकरिता दोन हजार १० आंदोलने केली. राज्यातील उर्वरीत महाविद्यालयांना देखील १०० टक्के अनुदान विनाविलंब देण्यात यावा, या मागणीकरिता राज्य पातळीवर सुरू असलेल्या संपाला जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी पाठिंबा दिला असून १० सप्टेंबर पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनगेल्या कित्येक वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना तातडीने वेतनाची तरतूद करण्यात यावी. या मागणीला घेवून जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमीक महाविद्यालयांतील शिक्षकांनी मंगळवारी (दि.११) जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेवून त्यांच्यापुढे गाऱ्हाने मांडले. यासंबंधीचे निवेदन त्यांना यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत उच्च माध्यमीक कृती समितीचे अध्यक्ष कैलाश बोरकर, व्ही. आर. पोंगळे, डी.सी. कटरे, डी.डी. बोपचे, एम. आर. शहारे, कु. जी. वाय. पटले, कु. जे.बी. पटले, एस. वाय. लिल्हारे, एस.बी.रंगारी, जी. एम. खैरे, एम. डी. पटले आदींचा समावेश होता.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcollegeमहाविद्यालय