शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शंभर टक्के लसीकरण करून तिसरी लाट थोपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 05:00 IST

डॉ. नितीन कापसे म्हणाले, पोलिओ लसीकरणासारखेच कोरोना लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा नाही. जिल्ह्यातील ४५ टक्के नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला आहे. महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हा कोरोना लसीकरणात सहाव्या क्रमांकावर आहे. व्हॉट्सॲप नंबर ८५९१४८९२३२ या कोविन पोर्टलशी कनेक्टेड केल्याचे सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता दर्शविली जात आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जास्तीतजास्त प्रमाणात लसीकरण करावे. शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठून तिसरी लाट थोपवा, असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना त्या बोलत होत्या. पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे उपस्थित होते.  जिल्हाधिकारी नयना गुंडे म्हणाल्या, कोरोना लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करायचे असून सध्या जिल्ह्यातील ७७ टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतलेला आहे. ८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान ‘मिशन कवचकुंडल’ अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. विभागाकडे १ हजार जम्बो सिलिंडर उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले म्हणाले, कोरोनाची लस घेणे हे कवचकुंडल आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यात यावे. लसीकरणासाठी गावनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कोरोना लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या अभियानात इंडियन मेडिकल असोसिएशन, खाजगी डॉक्टर, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग यांचा सहभाग घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात जास्तीतजास्त लसीकरण केलेल्या पहिल्या तीन जिल्ह्यांत आपल्या जिल्ह्याचासुद्धा समावेश असावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोरोना लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन केले असल्याचे सांगितले. 

लसीकरणात जिल्हा सहाव्या क्रमांकावर-डॉ. नितीन कापसे म्हणाले, पोलिओ लसीकरणासारखेच कोरोना लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा नाही. जिल्ह्यातील ४५ टक्के नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला आहे. महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हा कोरोना लसीकरणात सहाव्या क्रमांकावर आहे. व्हॉट्सॲप नंबर ८५९१४८९२३२ या कोविन पोर्टलशी कनेक्टेड केल्याचे सांगितले. कोरोना लसीकरणासाठी व्हॉट्सॲप-नोंदणीकरिता स्टार्टअप नवाना टेक लिमिटेड कंपनीद्वारे ॲप तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. त्याची सुरुवात गोंदिया शहरात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. आता व्हॉट्सॲपद्वारे लसीकरण नोंदणीसाठी या ॲपचा उपयोग नागरिकांना निश्चितच होणार आहे. ॲप हा मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी