शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुंडीपारवासीयांचे ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 21:15 IST

तिरोडा तहसील कार्यालय ते घाटकुरोडा रस्ता पूर्णत: उखडला असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे.

ठळक मुद्देमनोज डोंगरे यांचे नेतृत्व : तब्बल ११ वर्षांपासून रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तहसील कार्यालय ते घाटकुरोडा रस्ता पूर्णत: उखडला असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे. त्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून संपूर्ण रस्त्यावर चिखल पसरले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे कठिण झाले असून पायी चालण्यासाठीसुद्धा मोठीच कसरत करावी लागत आहे. सदर रस्त्याचे संपूर्ण नवीन बांधकाम करण्यात यावे, या मागणीला घेवून जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात मुंडीपारवासीयांनी रास्ता रोको आंदोलन केले.तब्बल ११ वर्षांपूर्वी दिलीप बन्सोड हे तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार असताना सदर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. तेव्हापासून या रस्त्याची साधी डागडुजीसुद्धा करण्यात आली नाही. या मार्गावर बेलाटी बु., मुंडीपार, मांडवी, सालेबर्डी, बिरोली, चांदोरी बु., घाटकुरोडा, घोगरा व एलोरा या नऊ गावांचा समावेश आहे. एलोरा पेपर मिलपर्यंत संपूर्ण रस्ता खराब झालेला आहे. यावर्षी मुंडीपार गावाजवळ या रस्त्यावर मुरूम न घालता शेतातील माती घालण्यात आली. त्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. रेतीघाटावरून धावणाºया अवजड वाहनांमुळेच सदर रस्त्याची दुरवस्था झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.बेलाटी, मुंडीपार, मांडवी, सालेबर्डी, बिरोली, चांदोरी व घोगरा या गावातील मुले शिक्षण घेण्यासाठी तिरोडा येथे जातात. मात्र सदर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी महामंडळाची स्कूल बस मागील महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.सदर रस्त्याची समस्या त्वरित सोडविण्यात यावी. जर तिरोडा-घाटकुरोडा मार्गाचे नवीन बांधकाम मंजूर करून कामाला सुरूवात करण्यात आले नाही तर येत्या आठ दिवसांत बेलाटी, मुंडीपार, मांडवी, घाटकुरोडा, घोगरा, चांदोरी व बिरोली येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांसह पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी दिला आहे.सदर आंदोलनस्थळी माजी आमदार दिलीप बन्सोड, सहायक पोलीस निरीक्षक पवार, नायब तहसीलदार रमेश कुंभरे आदींनी भेट दिली. सदर आंदोलनात संजय साठवणे, मुनिश्वर चौधरी, वासुदेव हरिणखेडे, रंगलाल रहांगडाले, सुनील गाढवे, चितुलाल पटले, चंपालाल साठवणे, ओमप्रकाश चौधरी, समीर बन्सोड, प्रल्हाद मारबदे, मुन्ना पटले, रॉकी कटरे, विनोद हरिणखेडे व इतर गावकरी सहभागी होते.घरकूल, शौचालय व विद्युत समस्यामुंडीपार गावात घरकूल व शौचालयांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना देण्यात आला नाही. ज्यांच्या घरी सुविधा आहेत त्यांचीच नावे यादीत आहेत व जे रस्त्यावर शौचास बसतात त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले, असा आरोप मुंडीपारवासीयांनी केला आहे. गावातील विद्युत समस्यासुद्धा कायम आहे. एकदा पुरवठा खंडित झाला की मग रात्रभर वीज पुरवठा होत नाही. अनेकदा रात्रभर अंधारात राहण्याची पाळी मुंडीपारवासीयांवर आली आहे. शिवाय लोंबणाºया विद्युत तारांची समस्यासुद्धा आवासून उभी आहे. उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होत नव्हता, मात्र आता वारंवार बत्ती गुल होत असून अंधारात राहण्याची पाळी उद्भवत आहे. गावातील पथदिवेसुद्धा बंदच असल्याचे मुंडीपारवासीयांनी सांगितले.अंतर्गत रस्ते वनाल्यांची समस्यामुंडीपार गावातील अंतर्गत रस्तेसुद्धा उखडले आहेत. सांडपाणी किंवा पावसाचे पाणी वाहून नेणाºया नाल्या नाहीत. थोड्याफार प्रमाणात ज्या आहेत त्या नाल्या तुटलेल्या आहेत. त्या केरकचºयाने तुंबल्या आहेत. गावात ज्या ठिकाणी रस्ते तयार करणे गरजेचे आहे, त्या ठिकाणी रस्ते तयार न करता जेथे गरज नाही तेथे रस्ते तयार केले जातात, असेही नागरिकांनी सांगितले आहे.