लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेत स्वयंपाकी महिला संघातर्फे स्वयंपाकी महिलांना दहा महिन्याऐवजी ऐवजी बाराही महिन्याचे मानधन देण्यात यावे, या मागणीला घेऊन स्वयंपाकी महिलांनी लक्षवेधी उपोषणाला सुरूवात केली आहे.२० फेब्रुवारी हे उपोषण तीव्र होत असून स्वयंपाकी महिला रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.जिल्हाभरातील स्वयंपाकी महिला आंदोलन करण्यासाठी पुढे आल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समित्या दोन महिलांना कामावर घेऊन एका स्वयंपाकी महिलेचे मानधन एक हजार रूपये वाटून देत आहेत. २०० ते २९९ विद्यार्थ्यांमागे तीन महिलांना प्रत्येकी एक-एक हजार रूपये घेण्यास बळजबरी करीत आहेत. सदर मानधन अत्यल्प असूनही स्वयंपाकी महिला व पुरूषच शाळेमध्ये पाषण आहार शिजवून देण्याचे काम करीत आहेत. म्हणून स्वयंपाकी महिलांना किमान वेतन लागू करण्यात यावा. स्वयंपाकी महिलांना सेवेतून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वयंपाकी महिलांना शाळा व्यवस्थापन समिती इतर महिलांकडून पैसे वसूल करून त्यांना कामावर घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मानधनातून अर्धे मानधन दुसऱ्या महिलांना देण्याची हुकूमशाही शाळा व्यवस्थापन समित्या चालवित आहेत. अर्धे मानधन देत नसाल तर उद्यापासून येऊ नका अश्या धमक्या दिल्या जात आहेत. शाळा व्यवस्थापन समित्यांनी शासनाच्या नियमाचा भंग केला आहे. शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी मागणी या संघटनेने केली आहे. स्वयंपाकी महिलांना नियुक्त करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांना नसावा तो अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांकडून काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.शाळा व्यवस्थापन समित्या आपल्या मर्जीतील महिलांना कामावर घेण्यासाठी वर्षानुवर्षापासून काम करणाऱ्या महिलांना कामावरून कमी करण्याचा खटाटोप करीत असतात. यासाठी ११ दिवस आयोजित केलेल्या लक्षवेधी उपोषणात जिल्हाध्यक्ष चंदा दमाहे, कार्याध्यक्ष मनोज दमाहे, अनिता तांडेकर, दिलीप चुटे, प्रीला राऊत, दिवाकर शेंडे, प्रतिभा बळगे, अरूणा तितिरमारे, भीमा वाघमारे, सरीता उके, अनुसया वंजारी, सुनिता पाऊलझगडे, गीता सोनवाने व इतरांचा समावेश आहे.
स्वयंपाकी महिलांचा उपोषणानंतर ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST
जिल्हाभरातील स्वयंपाकी महिला आंदोलन करण्यासाठी पुढे आल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समित्या दोन महिलांना कामावर घेऊन एका स्वयंपाकी महिलेचे मानधन एक हजार रूपये वाटून देत आहेत. २०० ते २९९ विद्यार्थ्यांमागे तीन महिलांना प्रत्येकी एक-एक हजार रूपये घेण्यास बळजबरी करीत आहेत.
स्वयंपाकी महिलांचा उपोषणानंतर ‘रास्ता रोको’
ठळक मुद्देआज आंदोलन : बारा महिन्याचे मानधन देण्याची मागणी