शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची थट्टा बंद करा

By admin | Updated: November 4, 2016 01:35 IST

विरोधी बाकावर असताना धानाला प्रति क्विंटल तीन हजार रूपये भाव द्या म्हणून ओरडणारे आता फक्त ६० रूपये वाढवून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम

कोरोटे यांचा इशारा : प्रौढ कबड्डी स्पर्धेचे उद्घाटनसालेकसा : विरोधी बाकावर असताना धानाला प्रति क्विंटल तीन हजार रूपये भाव द्या म्हणून ओरडणारे आता फक्त ६० रूपये वाढवून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम करून थट्टा करीत आहेत. त्यांनी ही थट्टा बंद करावी अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा महासचिव व आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी केले. ते मुंडीपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. जय बजरंग क्रीडा मंडळ मुंडीपारच्या वतीने येथे तीन दिवसीय प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी नेते सहषराम कोरोेटे यांनी केले. अध्यक्षस्थानी पं.स. सालेकसाचे माजी सभापती यादनलाल बनोठे होते. प्रमुख अतिथी म्हणून सोनपुरी क्षेत्राच्या पं.स. सदस्य अर्चना राऊत, मुंडीपारचे सरपंच किरण वाघमारे, कावराबांधचे माजी सरपंच गजानन मोहारे, माजी सरपंच घनश्याम नागपुरे, बलीराम बसोने, राधेश्याम नागपुरे, खेमचंद उपराडे, झनक नागपुरे, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गुमानसिंग उपराडे, उपाध्यक्ष महेश वाघमारे, सचिव सुखदास लिल्हारे, पोलीस पाटील चंद्रपाल नागपुरे, अमरचंद जमदाळ, दयाराम चौडाये, भैयालाल भोयर उपस्थित होते. ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धेची मोठी उत्सुकता असून या वेळी युवा वर्गासह महिला-पुरूष शेतकरी व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी क्रीडा स्पर्धांचे महत्व सांगत सहषराम कोरोटे यांनी शेतकऱ्यांपुढे विद्यमान युती शासनाच्या नाकर्तेपणा समोर आणणाचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, सत्ता प्राप्त करण्यासाठी नेहमी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लक्ष साधणारे मागील दोन वर्षात त्यांच्या वेदना समजून घेण्यात मुळीच लक्ष देताना दिसत नाही. पोकळ घोषणा करणारे प्रत्यक्षात कधीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. या बाबी आता सर्वसामान्य जनतासुध्दा समजू लागली आहे, असे कोरोटे म्हणाले. या वेळी यादनलाल बनोठे व इतर मान्यवरांनीसुध्दा आपले विचार मांडले. ही खुली स्पर्धा असून यात कोणीही आपली चमू बनवून सहभागी होत आहेत. स्पर्धा बघण्यासाठी तालुक्यातील विविध गावातून प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. गावात स्पर्धा होत असल्याने व शेतकरी प्रेक्षकसुध्दा वेळ काढून येत आहेत व स्पर्धेचा आनंद घेत आहेत.प्रास्ताविक गुमानसिंह उपराडे यांनी मांडले व स्पर्धेतील नियम व अटी बद्दल माहिती सादर केली. तसेच सर्वांनी खेळ भावनेतून सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी भोजराज चौडाये, विजय लिल्हारे, राजकुमार वाघमारे, गेंदलाल जमदाड, महेश उपराडे, कैलाश मेश्राम, खेमराज किरसान, राजकुमार बसोने, कुवर वाघमारे, मदन वाढई, भागीराम नागपुरे, रमेश लिल्हारे, पन्नालाल नागपुरे, राजेंद्र भोयर, सुकदास बसोने,ओमेश बसोने, भूषण मोहारे, महेंद्र नागपुरे, जितेंद्र नागपुरे,सोविंद भोयर, वामन परसगाये, सुंदर मानकर, रविंद्र भोयर, व इतर सहकारी सहकार्य करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)