शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांकडून दाखले देणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:08 IST

तालुक्यातील नागरिकांना विविध कामांसाठी आवश्यक प्रमाणपत्र ७० वर्षापासून मिळत होते. पण सध्या तलाठ्यांनी प्रमाणपत्र देणे बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देलाभार्थी योजनेपासून वंचित : ३८ प्रकारच्या दाखल्यांची समस्या

राजीव फुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील नागरिकांना विविध कामांसाठी आवश्यक प्रमाणपत्र ७० वर्षापासून मिळत होते. पण सध्या तलाठ्यांनी प्रमाणपत्र देणे बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आमगाव तालुक्यात तलाठी कार्यालयातून विविध दाखले देण्याचा तलाठ्यांना अधिकार नसल्याचे कारण सांगून दाखले देण्यास तलाठी संघटनेने मनाई केली आहे.दाखल्यामुळे नागरिकांची शासकीय कामे खोळंबली आहेत. शासकीय कर्मचाºयांना शासनाकडून कुठलेही निर्देश प्राप्त न झाल्याने तलाठी व नागरिक संभ्रमाच्या स्थितीत आहेत. राज्यात नागरिकांना शासकीय कार्यालयात लागणारे प्रमाणपत्र तलाठ्यांमार्फत मिळायचे. त्यामुळे शासकीय कामे लवकर व्हायची. सदर प्रकरणी काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार तलाठ्यांना ३८ प्रकारचे दाखले देण्याचे अधिकार नसल्याचे कळले. त्यामुळे राज्य पटवारी संघाद्वारे नागरिकांना लागणारे ३८ प्रकारचे प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेतला. सदर प्रमाणपत्रात वारसान प्रमाणपत्र, भूमिहिन शेतमजूर, वंशावळ, रक्त संबंधी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, संयुक्त कुटुंब प्रमाणपत्र, विभक्त प्रमाणपत्र, १९६६ चे कलम २५ (२) अंतर्गत वृक्ष असल्याचे प्रमाणपत्र, निराधार, भिखारी व धर्मदाय संस्थाच्या माध्यमातून मिळणारी मदत, विधवा, परित्यक्ता प्रमाणपत्र, पुर्नविवाह न झाल्याचे प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील प्रमुखाचे प्रमाणपत्र, शासकीय नोकरीत असल्याचे किंवा नसल्याचे प्रमाणपत्र, चल-उचल संपत्ती, ओलित किंवा पडित बागायती कृषी प्रमाणपत्र, जमिनीच्या किमतीचा पंचनामा, कृषी जमिनीचा नकाशा, जमिनीची चर्तुसिमा, विद्युत पंप असल्याचे प्रमाणपत्र, अस्वच्छ व्यवसाय, मुलबाळ असल्याच व, नसल्याचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, भूमिहिन प्रमाणपत्र असे अनेक प्रमाणपत्र दिले जात होते.सध्या सदर प्रमाणपत्र देणे बंद झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून तर लाभार्थ्यांना शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाकडून अद्याप कुठलेही निर्देश देण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचारी व लाभार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यांची भरपाई कोण करणार असा सवाल उपस्थित होत आहे.राज्य पटवारी संघाच्यावतीने दाखले देणे बंद करण्यात आले आहे. पण शासनाकडून कुठलेही आदेश निर्गमित करण्यात आले नाही. नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनात आल्याने शासनस्तरावर यावर निर्णय घेतला जाईल. वरिष्ठांच्या आदेशावरुन प्रमाणपत्र वितरणाची सोय करण्यात येईल.-एस.एल. नागपुरेनायब तहसीलदार, आमगाव