शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

रेल्वे फलाटावरील मद्यप्राशन बंद

By admin | Updated: January 15, 2015 22:53 IST

‘रेल्वे स्थानक की खुले मदिरालय’ अशी बातमी लोकमतमध्ये प्रकाशित होताच दुसऱ्या दिवसापासून पासिंग रस्त्यावर रेल्वे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त सुरू केली. तसेच पार्सल पासिंग रस्त्याची

उशिरा सुचले शहाणपण : सर्व जबाबदारी पोलिसांचीच काय?गोंदिया : ‘रेल्वे स्थानक की खुले मदिरालय’ अशी बातमी लोकमतमध्ये प्रकाशित होताच दुसऱ्या दिवसापासून पासिंग रस्त्यावर रेल्वे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त सुरू केली. तसेच पार्सल पासिंग रस्त्याची स्वच्छताही होत आहे. त्यामुळे आता होम फलाटावर दारूचे रिकामे पव्वे व बियरच्या खाली बाटल्या दिसून येत नाही.विशेष म्हणजे या प्रकाराबाबत रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.यू. सिंग यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले की, रेल्वेच्या फलाटावर दारू प्राशन करणे चुकीचे असून त्यातून अनेक प्रवाशांची गैरसोय होते. मात्र त्यावर आळा घालण्याची जबाबदारी केवळ पोलीस प्रशासनाचीच आहे काय? इतर सुज्ज्ञ प्रवाशी, रेल्वेचे स्वच्छता कर्मचारी किंवा रेल्वेच्या इतर कर्मचाऱ्यांना हा प्रकार आढळत असल्यास त्यांनी पुढाकार घेवून पोलिसांना कळविणे आवश्यक आहे. मात्र कुणीही या प्रकाराबाबत आम्हाला कळवित नाही. असे प्रकार फलाटावर दिसून आल्यास दूरध्वनीवरून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या प्रतीक्षेत काही प्रवाशी रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफार्मजवळ असलेल्या पार्सल पासिंग रस्त्यावरच मद्य प्राशन करून दारूचे रिकामे पव्वे व बियरच्या खाली बाटल्या भिंतीशेजारी ठेवून द्यायचे. हा प्रकार रेल्वेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना नक्कीच माहीत असेल. याचे कारण म्हणजे सकाळी स्वच्छता करतेवेळी हे रिकामे पव्वे त्यांना आढळतात. परंतु त्यांच्यापैकी कुणीही ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू होता.लोकमतने हा प्रकार रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे पोलिसांनीसुद्धा होम प्लॅटफॉर्मवरील पार्सल पासिंग रस्त्याकडे आपले लक्ष केंद्रीत केले असून फलाटावर होणाऱ्या या गैरप्रकाराला सध्यातरी आळा बसल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)