शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

संतप्त पालकांनी केले पाल्यांना शाळेत पाठविणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:35 IST

गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणारी जि.प.वरिष्ठ प्राथमिक डिजीटल शाळा निंबा येथे शिक्षण विभागाने सहा महिन्याचा कालावधी लोटूनही शिक्षकांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी सोमवार (दि.१५) पासून आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. तसेच जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देशिक्षकाची नियुक्ती करण्यास टाळाटाळ : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा-तेढा : गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणारी जि.प.वरिष्ठ प्राथमिक डिजीटल शाळा निंबा येथे शिक्षण विभागाने सहा महिन्याचा कालावधी लोटूनही शिक्षकांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी सोमवार (दि.१५) पासून आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. तसेच जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे शाळा सुरू असूनही विद्यार्थ्यांना अभावी बंद असल्याचे चित्र होते. प्राप्त माहितीनुसार निंबा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजीटल शाळेत वर्ग १ ते ७ असून शिक्षकांची सहा पदे मंजूर आहेत. मात्र मागील सहा ते सात महिन्यापासून शिक्षकाची तीन पदे रिक्त आहेत. परिणामी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी पालकांनी वांरवार केली. मात्र जि.प.शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी याची अद्यापही दखल घेतली नाही.त्यामुळे पालकांमध्ये रोष व्याप्त होता. विशेष म्हणजे यापूर्वी सुध्दा शिक्षकांची नियुक्ती न करण्यात आल्याने पालकांनी १७ सप्टेंबरला शाळेला कुलूप ठोकले होते. तेव्हा गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दोन दिवसात शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आश्वासन भ्रमणध्वनीद्वारे दिले होते. मात्र आता महिन्याभराचा कालावधी लोटूनही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. शिक्षक न नसल्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांनी सोमवारपासून (दि. १५)आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती होत नाही. तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठविणार नाही. अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. येथील शाळेत एकूण १२२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संपूर्ण विद्यार्थ्याची जबाबदारी केवळ तीन शिक्षकांवर अवलंबून आहे. यातून मुख्याध्यापकांचा अर्धा वेळ दस्तावेज अद्ययावत ठेवण्यामध्ये जातो. परिणामी विद्यार्थ्याना शिकविण्यात अडचण जात आहे. या शाळेत तीन शिक्षक कार्यरत असून पुन्हा तीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दरम्यान पालकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर याप्रकरणी शिक्षण विभाग नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वाय.एस.कटरे या शिक्षकाची जि.प.शाळा निंबा येथे तात्पुरती नियुक्ती केली होती. परंतु त्यानी निंबा शाळेत नियुक्ती घेतली नाही म्हणून आज पंचायत समिती गोरेगाव येथील मासीक सभेत ठराव पारीत केला. यावरुन उद्या एका शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार आहे. संच मान्यतेनंतर स्थायी स्वरुपात शिक्षकाची नियुक्ती केली जाईल.एम.बी.लाडे, गटशिक्षणाधिकारी, पं.स.गोरेगाव.