शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

आकडेबाजांचे वाढले टेंशन

By admin | Updated: June 18, 2016 01:06 IST

आकडा लावून होत असलेल्या वीज चोरीवर आळा घालण्यासाठी लावण्यात आलेले एरीयल बंच केबल आकडेबाजांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे.

वीज कर्मचाऱ्यांना मारहाण : माताटोली परिसरातील घटना गोंदिया : आकडा लावून होत असलेल्या वीज चोरीवर आळा घालण्यासाठी लावण्यात आलेले एरीयल बंच केबल आकडेबाजांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. या केबलवर आकडा अडकत नसल्याने आकडेबाजांचा पारा चढला असून यातूनच शहरातील माताटोली परिसरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. वीज चोरीत गोंदिया जिल्हा महावितरणच्या यादीत अग्रस्थानी आहे. वीज चोरीमुळे वीज कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. वी चोरीच्या प्रकारांवर वीज कंपनीकडून कारवाया केल्या जात आहेत. मात्र त्याचे पाहिजे त्या प्रमाणात फलीत येत नाही. परिणामी वीज कंपनीकडून वीज चोरी होत असलेल्या भागांत आता एरीयल बंच केबल लावले जात आहे. या केबलच्या आत वीज वाहिनी राहत असून वर प्लास्टिक कवर राहत असल्याने त्यावर आकडा लावता येत नाही. परिणामी आकडेबाजी होत नसून वीज चोरी करता येत नाही. शहरातील माताटोली परिसरातही अशाचप्रकारे एरीयल बंच केबल लावण्यात आले आहे. त्यामुळे येथे आकडे टाकणाऱ्यांचे फोफावत नसून याचाच त्यांच्यात रोष आहे. यातच जावेद शेख (२६) नामक तरूणाने माताटोली केंद्रातील कर्मचाऱ्यांना केबल झिलून देण्यास म्हटले होते. मात्र त्यांनी केबल झिलून देण्यास नकार दिला होता. याचाच राग डोक्यात धरून जावेद शेख याने रात्रीला माताटोला कार्यालयात जाऊन लाईनमन सुनील रामदास राऊत, सुमेश डी. मेश्राम, राजू बी. गणवीर व कंत्राटादाराचे कर्मचारी उद्गल बिसेन यांना मारहाण केली. कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या या घटनेमुळे वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांत रोष व्याप्त आहे. (शहर प्रतिनिधी)वीज कर्मचाऱ्यांनी नोंदविला निषेध लाईनमनला मारहाण करण्यात आल्याबाबत सबॉर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशनच्यावतीने परिमंडळ कार्यालयासमोर गेट मिटिंग घेऊन घटनेचा निषेध नोंदविला. मारहाण करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली. मिटिंगला संघटनेचे पदाधिकारी हरीश डायरे, सुहास धामनकर, सुमित पांडे, सुनील रेवतकर, सुनील मोहुर्ले, दिनेश बोंदरे, एस.आर. खान, अनुप ढोके, एस.बी. दास, विनय नेवारे, प्रदीप मोहीतकर, अक्षय इंगळे, एस.आर. कायंदे, प्रशांत वडसकर, अश्विन शहारे, वनश्री कुंभरे, श्वेता मोरे, जीवनलता वडसकर, पीयूष पटले व अन्य उपस्थित होते. मारहाणीची पोलिसांत केली तक्रार लाईनमेनला मारहाण केल्याप्रकरणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता धामनकर, सहायक अभियंता कुमार कोकणे, कनिष्ठ अभियंता प्रदीप मोहीतकर यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४,५०६,१५१ अंतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक केली आहे.