शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १९ हजार लसींचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू असून, कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढत असताना दिसत आहे. ...

ठळक मुद्दे ५९ हजार नागरिकांचे लसीकरण : लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू असून, कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढत असताना दिसत आहे. असे असतानाही पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण होत नसले तरीही आतापर्यंत जिल्ह्यातील ५८ हजार ७९८ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे, तर आता जिल्ह्यात १९०५० डोसचाच साठा उरला आहे. जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाइन कोरोना वर्कर्सला देण्यात आली. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता केंद्र शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच ४५ वर्षांवरील काही आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यास मुभा दिली. त्यानुसार, देशासह जिल्ह्यातही लसीकरण सुरू आहे. या लसीकरणांतर्गत जिल्ह्याला आतापर्यंत लसीचे ७९९०० डोस मिळाले आहेत, तर आतापर्यंत ५८ हजार ७९८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्याकडे आता १९०५० डोस उरले आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून, यासाठी १४ जानेवारी रोजी जिल्ह्याला १०००० डोस देण्यात आले होते. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी ८००० डोस, १५ फेब्रुवारी रोजी ८३०० डोस, तर २ मार्च रोजी १०६०० डोस देण्यात आले होते. सुरुवातीला हे सर्व डोस कोविशिल्डचेच होते. मात्र, लसीकरणाला गती देण्यासाठी  १२ मार्च रोजी जिल्ह्याला ४३००० डोस देण्यात आले. यामध्ये १८००० कोविशिल्डचे, तर २५००० डोस कोव्हॅक्सिनचे आहेत. म्हणजेच, आतापर्यंत एकूण ७९९०० डोस जिल्ह्याला मिळाले असून, आता १९०५० डोस उरले आहेत. यामध्ये १२७२० डोज कोव्हॅक्सिनचे असून, ६३३० डोस कोविशिल्डचे आहेत. कोविशिल्डलाच जास्त पसंती  जिल्ह्यात आतापर्यंत ५८७९८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ५१४६६ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर ७३३२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. विशेष म्हणजे, लस घेणाऱ्या नागरिकांत ४७०५२ नागरिकांनी कोविशिल्डचा डोस घेतला असून, ११७४६ नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे. यावरून कोविशिल्डला घेण्यासाठी नागरिक जास्त पसंती देत असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नागरिकांनी पुढे येण्याची गरज  १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यानंतरही आतापर्यंत फक्त ५८७९८ नागरिकांनी लस घेतली असल्याचे दिसत आहे. यातच पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांचा समावेश आहे. आता २ महिन्यांच्या या कालावधीत फक्त  ५८७९८ नागरिकांनी लस घेणे म्हणजे लसीकरणाला हवी तशी गती दिसून येत नाही. कोरोनाची लस सर्वांसाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असून, आता कोरोनाचा कहर पुन्हा वाढत असल्याने नागरिकांनी लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस